निपाणी (वार्ता) : येथील धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेचा २४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. संस्थेने यशस्वीरीत्या २५ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त संस्थेच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी संचालक महेंद्र सांगावकर यांच्या हस्ते महालक्ष्मी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. नितीन साळुंखे यांनी स्वागत केले. संस्थेची यशस्वीपणे घोडदौड सुरू असून सहकार क्षेत्रात निपाणी परिसरामध्ये संस्थेने नांवलौकीक मिळविल्याचे संचालक सांगावकर यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक रवींद्र शिंदे यांनी,संस्थेकडे १७ कोटीच्यावर ठेवी असून ११ कोटी रुपये कर्जवाटप केले आहे. अहवाल सालात संस्थेने
५२ लाख इतका निव्वळ नफा मिळविलेला आहे. सभासद व ग्राहकांसाठी ‘ई’ स्टॅम्पिंग, थर्ड पार्टी क्लिअरिंग सुविधा, अल्पदरात डिमीड ड्राफ्ट, आरटीजीएस, एनईएफटी अशा सुविधा उपलब्ध असून कामकाजाचे संपूर्ण संगणकीकरण केले आहे.
कार्यक्रमास उपाध्यक्ष मधुकर खवरे, संचालक सुनिल वाडकर, सुनिल काळगे, सुभाष कुकडे, अनिल सांगावकर, राहुल शिंदे, विशाल खवरे, विरेंद्र यडूरे, सुनिता शिंदे, सुप्रिया चोरगे, संजय चोरगे, सेक्रेटरी अनिल भोसले, सतिश यडूरे, भास्कर आजरेकर, विजय कदम, मंगल वाडकर, स्मिता चिंचली, सोमश येरुडकर, शिवाजी पठाडे, किशोर सांगावकर, रफिक नाईकवाडी, परवेज नाईकवाडी, रमेश कुरणे, अवि सांगावकर, राज सांगावकर, सलीम मुल्ला, सतिश कराळे, महादेव पाटील, अलका इंदुलकर, पप्पू शिंदे, वासुदेव पेंटर यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते. संतोष व्हडगे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta