खाद्यपदार्थ विक्री व्यवसायिकांना प्रशिक्षण बंधनकारक : व्यवसायिकांना मिळणार प्रमाणपत्र
निपाणी : केंद्र शासनाच्या एफएसएसएआय व फॉस्टॅक योजनेतून खाद्यपदार्थ आणि फळ विक्री व्यवसायिकांना अन्न व औषध प्रशासनातर्फे बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवसायिकांना हे प्रशिक्षण बंधनकारक असून त्यानंतर सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यासाठी सर्व व्यवसायिकांनी या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिबिर संयोजक हिटलर माळगे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या या योजने अंतर्गत सर्व खाद्यपदार्थ विक्री करणार्या सर्व व्यावसायिकांना अन्न व सुरक्षेसाठी प्रशिक्षण व नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. तसेच जे व्यावसायिक नोंदणी करण्यास टाळाटाळ करतील, अशा व्यावसायिकांना त्यांचे इतर प्रमाणपत्र नूतनीकरण होणार नाही, असा शासनाने आदेश पारित केला आहे. केंद्र शासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता फसाई धीरळ अंतर्गत रिलचे प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाहणी करुन फॉर्म भरून व्यापारी, व्यवसायिक, लहान, मोठे हॉटेल, खानावळी, कॅन्टीन, आहार उत्पादक, भाजीपाला व्यापारी आणि इतर वर्गाच्या ऑनलाइन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करत आहेत. त्यांच्याकडे सर्व व्यापारी वर्गानी नोंदणी करून करून घ्यावी. या प्रशिक्षणातून दुकानांमध्ये साफसफाई कशी ठेवावी, अन्न सुरक्षेबाबत माहिती दिली जात आहे. तरी व्यवसायिक आणि व्यापारी वर्गासाठी हे प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. सदरचे प्रशिक्षण न घेतल्यास नवीन परवाना, जुन्या परवान्याचे नूतनीकरण अशी कामे होणार नाही. त्यासाठी सर्वच व्यवसाय त्यांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ही अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Check Also
पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …