Monday , April 22 2024
Breaking News

म्युनिसिपल शाळेसाठी रस्त्यावर उतरणार!

Spread the love

डोंगरी भागातील माजी विद्यार्थ्यांचा निर्धार : ग्रामीण भागात बैठका
निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी शहरासह ग्रामीण आणि डोंगरी भागाच्या सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या मुलांच्यासाठी कामधेनू ठरलेल्या निपाणी येथील मुन्सिपल हायस्कूल सरकारकडे हस्तांतरण करण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. त्यामुळे भविष्यकाळात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आणि पालकांची हेळसांड होणार आहे. त्यामुळे हस्तांतराचा कुटिल डाव हाणून पाडून कोसळणार्‍या ज्ञानू कशासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार शहरासह ग्रामीण आणि डोंगरी भागातील आजी-माजी विद्यार्थ्यांसह पालकांनी केला आहे. त्याबाबत यांना शिरगुप्पी परिसरात बैठका सुरू असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती यरनाळ येथील संभाजी गायकवाड यांनी दिली.
स्वातंत्र्यापूर्वी पासून मोठ्या दिमाखात उभी असणारी पुष्पल हायस्कुल शाळा ही केवळ दगड-मातीचे नसून ती गोरगरिबांचा आधारवड आहे येथे सर्वसामान्य कुटुंबातील शेकडो मुलांनी शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आपले नोकरी व्यवसाय सांभाळत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे या उद्देशाने कर्नाटकातील अपवादात्मक असणारी ही मुन्सिपल हायस्कूलची शाळा म्हणून नगरपालिकेने निर्माण केली. आजतागायत नगरपालिकेत अनेक स्थित्यंतरे झाली पण कुणीही या शाळेकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही उलट अभिमानाने प्रत्येक नगराध्यक्ष व नगरसेवकांनी या ठिकाणी झेंडा फडकवला होता.
सध्या शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील चौथी पिढी या हायस्कूलमध्ये शिकत आहे. पण व्यापारी वृत्तीने आलेल्या काही नेत्यांच्या डोळ्यात ही इमारत टोचू लागली आहे म्हणूनच शासनाकडे ही शाळा हस्तांतरणाचा घाट घातला आहे.
शेतकर्‍यांमध्ये अमुलाग्र बदल होत असल्याने पालकांच्या आग्रहास्तव आता इंग्रजी माध्यम शाळाही नगरपालिकेतर्फे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी सुरू केली आहे. शिवाय शाळेला ऊर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असे असतानाही राजकारण्यांनी शाळेचा ताबा घेण्यास सुरुवात केलेली बाब दुर्देवी आहे. या शाळेत शिक्षण घेतलेल्या व याच शाळेचा झेंडा फडकवणार्‍या आजी-माजी नगरसेवकांनी या शाळेची सुधारणा करण्याऐवजी कि शासनाकडे हस्तांतरण करून कृतज्ञ ऐवजी कृतघ्नतेचे प्रदर्शन केले आहे त्यामुळे ही शाळा वाचविण्यासाठी ग्रामीण व डोंगरी भागातील आजी माजी विद्यार्थी कमी पडणार नसल्याच्या प्रतिक्रिया लक्ष्मण संकपाळ, रघुनाथ संकपाळ, सुभाष डावरे, रामचंद्र संकपाळ, केशव कांबळे, बाळासाहेब डावरे, संजय पाटणकर, हनमंत हवालदार, बाळासाहेब मोहिते, गोरखनाथ मधाळे, भिकाजी मधाळे, सदाशिव डोणे, बाळासाहेब डावरे, मधुकर ऐवाळे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.

—–
’सुधारणेच्या नावाखाली म्युन्सिपल हायस्कूलचे शासनाकडे हस्तांतरण म्हणजे देशात सुधारणा करण्यासाठी देश ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याचा प्रकार आहे.’
– अण्णासाहेब खोत, शिक्षक
——
’भक्कम इमारत सुसज्ज वातावरणाचा उपयोग करून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना नवनव्या प्रशिक्षणाची संधी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक ऋणातून मुक्त होण्याची संधी मिळणार आहे.’
– आनंद संकपाळ, माजी विद्यार्थी
—–
’गेल्या दोन वर्षापासून त्या ठिकाणी इंग्रजी माध्यम कॉन्व्हेंट शाळा सुरू केले आहे त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे हित होणार आहे परिणामी धनदांडग्यांच्या शाळा ओस पडण्याची भीती असल्यानेच हस्तांतराचा घाट घातला आहे.’
– संभाजी गायकवाड, माजी विद्यार्थी

About Belgaum Varta

Check Also

काँग्रेसला मताधिक्य मिळेल!

Spread the love  केपीसीसी प्रवक्ते मुनीर : बुथ प्रतिनिधींना प्रशिक्षण निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *