निपाणी (वार्ता) : भारत सरकारच्या आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त शैक्षणिक संस्था आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा बोर्ड नवी दिल्ली यांनी 2022-23 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील पदव्युत्तर समकक्ष डीएनबी या पदवीसाठी नवी दिल्ली येथे परीक्षा घेतली होती. या परीक्षेत निपाणीची सुकन्या डाॅ. ऋचा मधुसूदन चिकोडे ही उत्तीर्ण झाली आहे. तिला डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड मंडळा कडुन वैद्यकीय क्षेत्रातील स्त्री रोग व प्रसूती शास्त्रतज्ञ म्हणून डीएनबी ही पदवी मिळणार आहे.
डाॅ.ऋचा चिकोडे या सध्या मिरज मेडिकल कॉलेजमध्ये वरीष्ठ निवासी डाॅक्टर म्हणून रुग्णसेवा करीत आहेत. निपाणीतील मराठी माध्यमातून त्यांनी जिजामाता बालक मंदीर, कुमार मंदीर, मराठा मंडळ शाळा, देवचंद काॅलेज मधुन शिक्षण पूर्ण केले. तर पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेज पुणे येथून एम.बी.बी.एस. व एम.एस पदवी घेतली. कोरोना काळात बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी कोरोना योद्धा म्हणून उत्कृष्ट काम केले होते. या यशाबद्दल डाॅ. ऋचा याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta