निपाणी (वार्ता) : येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा सुधारणा समितीची अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी भोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी माजी अध्यक्ष रमेश वास्कर, उपाध्यक्ष अर्चना भादुले, मौला मुजावर, रेश्मा सौदागर, रफिक चोकावे, माधुरी नरशींगे, रामचंद्र पवार, जनार्धन कांबळे, रेश्मा माने, सीमा महाजन, पांडुरंग मुसळे, काकासाहेब वाघमोडे, सागर नेजे, सुरेखा गिरी, कीर्ती माळी, उज्वला यादव उपस्थितीत होते. या निवडीसाठी गटशिक्षणाधिकारी रेवती मठद, सी. आर. सी प्रमुख आर. एस . माळी, मुख्याध्यापक आर. एम. पकाले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
नूतन अध्यक्षांनी शाळेच्या सुधारणेसाठी आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. मुलांच्या पटसंख्येच्या वाढीसाठी आपला अधिक भर असणार आहे. रात्री शालेय परिसरात होत असलेले गैर प्रकारावर आळा घालण्यासाठी उपाय योजना आखली जाणार आहे. यासाठी सर्व पालक व गावातील नागरिकांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे भोरे यांनी सांगितले. यावेळी सर्वच शाळा सुधारणा समिती सदस्यांनी शाळा सुधारणे साठी आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार सांगून पालक व नागरिकांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगितले. याप्रसंगी शिक्षक, पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta