महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा; वरून राजाच्या हजेरीने दिलासा
निपाणी (वार्ता) : रामपूर (ता. चिकोडी) येथे सोमवारी (ता.३) महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा करण्यात आला. बैलांना दुपारपर्यंत सजवून संध्याकाळी त्यांची वाद्यांच्या गजरात उत्साहात मिरवणूक काढून बैलपोळा सण उत्साहात साजरा झाला. यावेळी गाव कामगार पाटील महेश पाटील यांच्या बैलजोडींना कर तोडण्याचा मान देण्यात आला होता.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून, शेतकरी बांधवांनी हा सण साजरा केला. आषाढी पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रीय बेंदूर रामपूर या कर्नाटकातील गावात गेल्या अनेक वर्षांपासून साजरा करण्याची परंपरा आहे. यावर्षी सोमवारी हा सण साजरा केला. या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून आराम देऊन त्यांची पूजा करण्यात आली. ज्यांच्याकडे बैल नाहीत, अशा नागरिकांनी घरी मातीच्या बैलांची पूजा केली.
आदल्या दिवशी रविववारी (ता.२) बैलांना आवतण देण्यात आले. या दिवशी त्यांना आंघोळ घालून त्यांच्या खांद्याला हळद व तुपाने शेक घेण्यात आला. नंतर बैलांना रंगोटीसह पाठीवर नक्षीकाम केरून झूल घातली होती. शिंगांना रेबिन, घुंगरांच्या माळा घालून बैलांना गोड नैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळी बन्नी झाडांची रचलेली कर तोडण्यात आली. महेश पाटील, गाव कामगार पाटील पप्पू पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते घरी बैलांची पूजा करण्यात आली.
यावेळी कुमार पाटील, विनायक पाटील, वल्लभ देशपांडे अण्णासाहेब तांदळे, सचिन पोवार, सचिन मदने, गोविंद पोवार, सुरज कुंभार, शशिकांत नेसरे, सचिन चौगुले, बाळासाहेब पाटील, अभिषेक तांदळे, शशिकांत मदने, भगवान सुतार, अन्नु पोवार, अमर बंकापुरे, मलगोंडा पाटील, विश्वजीत पाटील, प्रवीण पाटील, हरिश्चंद्र कुंभार, बापूसाहेब कुंभार, तात्यासाहेब कोरवी, रामचंद्र जाधव, सुभाष पाटील, प्रतीक पाटील, संदेश कागलकर, महादेव जाधव, भाऊसाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Belgaum Varta Belgaum Varta