अभिनंदन पाटील; ‘अरिहंत’च्या निपाणी शाखेचा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य शेतकरी छोटे उद्योजक आणि व्यवसायिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेचे रोपटे लावले होते. त्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यासह सर्वसामान्यांचे हित जोपासले आहे. याशिवाय अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरू असलेल्या समाजकार्याची व्याप्ती आणखीन वाढवून सामान्यांना दिलासा देणार असल्याचे मत, युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी व्यक्त केले. अरिहंत संस्थेच्या निपाणी शाखेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी शाखेचे संचालक शशिकुमार गोरवाडे दाम्पत्यांच्या हस्ते पूजा घालण्यात आली. त्यानंतर बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील व मानवारांच्या हस्ते आरती करण्यात आली.
उत्तम पाटील म्हणाले, अरिहंत संस्थेच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्व स्तरातून मदत केली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस संस्थेवर विश्वास वाढत चालला आहे. सभासदांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. ठेवीदार कर्जदार आणि कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यामुळे संस्थेची प्रगती होत असल्याचे सांगितले. सकाळी दहा वाजल्यापासून संस्थेच्या कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी निपाणी आणि परिसरातील ग्राहकासह नागरिकांची गर्दी झाली होती.
यावेळी माजी आमदार प्रा.सुभाष जोशी, नगरसेवक संजय सांगावकर, विलास गाडीवड्डर, संजय पावले, सुनील शेलार, दीपक सावंत, डॉक्टर जसराज गिरे, निपाणी शाखेचे संचालक दिलीप पठाडे, राजू पाटील-अक्कोळ, रमेश भोईटे, भाऊसाहेब पाटील, शिरीष कमते, इम्रान मकानदार, निरंजन पाटील-सरकार, गजानन कावडकर, नगरसेविका उपासना गारवे, विशाल गिरी, बाळासाहेब पाटील (गोल्डन बाबा), अरुण जाधव अरिहंतचे मुख्य व्यवस्थापक अशोक बंकापुरे यांच्यासह नगरसेवक निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. निपाणी शाखा व्यवस्थापक आर.एम. बन्ने यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta