निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल हायस्कुल मधील शिक्षक रमेश सिद्धाप्पा भाइनाईक हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त भाइनाईक व त्यांच्या पत्नी सरोजिनी देवी तुप्पद दांपत्याचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका रविकुमारी चव्हाण होत्या.
यावेळी भाइनाईक यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांनी प्रमाणिकपणा, प्रयत्न, सत्य, गुरुनिष्ठा, मोठ्यांचा आदर करणे, असे सद्गुण अंगी बाळगून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापिका चव्हाण, मल्लाप्पा नाईक व निवृत्त शिक्षक शिवाजी वडणकर यांनी भाइनाईक यांच्या कार्याचा आढावा घेतला. आक्काताई कुंभार यांनी स्वागत दत्तात्रय बामणे यांनी प्रास्ताविक केले. विजय झिपरे यांनी सूत्रसंचालन केले. सतिश आरभावे यांनी आभार मानले. यावेळी विठ्ठल कटगे, विवेकानंद निंबाळकर, रेश्मा आरब यांच्यासह आजी, माजी शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta