निपाणी भागातील चित्र : पेरणीसाठी चांगला पाऊस आवश्यक
निपाणी (वार्ता) : जून महिन्यापासून पावसाची प्रतिक्षा करत असताना अखेर जूनच्या शेवटी विलंबाने का होईना पण किरकोळ पावसाचे आगमन झाले. मात्र अजूनही तुरळक पाऊस सुरू असून चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहे. दरम्यान तुरळक झालेल्या पावसावर बळीराजाने आता मोठा पाऊस होईल, या अपेक्षेने निपाणी भागातील शेतकरी जोखीम पत्करून पेरणीला सुरुवात केली असून शेतकऱ्यांचे मोठ्या पावसासाठी आभाळाकडे लागले आहे.
बळीराजासमोर गेल्या काही वर्षांपासून नेहमीच कोणत्या कोणत्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या वर्षी पाऊस उशीरा सुरू झाला आला तरीही आपआपल्या सोयीनुसार त्यांनी महागडे खत, बियाणे खरेदी केले आहे. दरवर्षी सोयाबीन हंगामावर पावसाची हजेरी लागत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून भावही चांगला मिळत नसल्याने बळीराजासमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शेतीवर आधारित लावलेला खर्चही निघत नसल्याने या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन कमी करुन पिक पद्धती बदल करण्याच्या प्रयत्नात आहेत. पेरणीनंतर बियाणे उगवणक्षमतेसाठी जमीनीत ओलावा आणि तुरळक पाऊसाची गरज असते. पण आभाळात दाटणाऱ्या ढगातुन तुरळक होणारा पाऊस दोन दिवसांपासून थांबला असल्याने पावसाचे काही ‘फिक्स’ नसले तरीही बळीराजा ‘रिक्स’ जेवण पेरणी करत आहे. परीसरातील शेतकऱ्यांसाठी पाऊस हा चिंतेचा ठरत असून अनेक शेतकऱ्यांनी महागडे खत, बियाणे वापरत पेरणी करत आहेत. आता बळीराजाला मोठ्या पावसाची गरज आहे.
——————————————————————–
‘दरवर्षी जास्त सोयाबीन पेरणी करत असतो. पण सोयाबीन पेरणीच्या हंगामात पाऊसच नसल्याने सोयाबीन कमी अन्य पिके घेण्याची वेळ आली आहे. चार दिवसापूर्वी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.पण दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस न झाल्याने चिंतेत वाढ होत असून मोठ्या पावसाची गरज आहे.
– अशोक पाटील, (अमरगोंडा), शेतकरी, बेनाडी
——————————————————————–
‘शहर आणि परिसरात पावसाच्या किरकोळ सरी पडत असल्या तरी अजूनही शेत जमिनीमध्ये पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पेरणी केल्यास उगवण क्षमता कमी होण्यासह उन्हामुळे पिकाचे मोड करपण्याची शक्यता आहे. याशिवाय पशुपक्षी आणि मुंगयाकडून बियाणे व मोडची नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमिनीत चांगला ओलावा झाल्यानंतरच पेरणी करणे आवश्यक आहे.’
– डॉ. एस. एम. सांगावे, निवृत्त कृषी अधिकारी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta