निपाणी (वार्ता) : येथील गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांची अन्यत्र बदली झाली आहे. त्यांच्या जागी बेनाडीच्या कन्या महादेवी नाईक या गुरुवारी (ता.६) रुजू झाले आहेत. त्यानिमित्त रेवती मठद आणि नाईक यांचा गटशिक्षणाधिकारी कार्यालय व विविध शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महादेवी नाईक यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेनाडी येथे झाले होते. त्यानंतर जी.आय. बागेवाडी कॉलेज आणि देवचंद महाविद्यालयातील त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर बंगळूर येथे केईएस परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पहिल्यांदाच त्या सदलगा येथील उर्दू शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यानंतर शिरगाव येथील सरकारी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले. याशिवाय प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काही काळ सेवा बजावली. त्यानंतर धारवाड येथील जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयात विषय निरीक्षक म्हणून काम केले. गुलबर्गा येथील सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही त्या कार्यरत होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांची निपाणी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. मठद आणि नाईक यांच्या सत्कार प्रसंगी भास्कर स्वामी, रावसाहेब जनवाडे, बाबुराव मलाबादे, सुनील शेवाळे, पी. टी. कांबळे, बी.एच. लंगोटी, पी. एम. कल्लोळी, एस. एम. भुसाने, एस. आर. प्रताप, प्रा. सुरेश कांबळे, नंदकुमार कांबळे, विद्यावती जनवाडे, अरविंद कांबळे, एम. वाय. गोकार, तेजस्विन बेळळली, सदाशिव तराळ, आयुबखान पठाण, सुरेश शास्त्री, सदाशिव वडर यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.