महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजन : मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण
निपाणी (वार्ता) : रामपूर (ता. चिकोडी) येथे महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजित दुबैली गाड्यांच्या शर्यतीत दानोळीच्या अमोल पोवार यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे १० आजाराचे बक्षिस पटकाविले. तर बंडा हवालदार-तळदगे व विक्रम शेटे- अक्कोळ यांच्या बैल गाडीने अनुक्रमे द्वितिय व तृतीय क्रमांकाची ७ हजार व ५ हजार रुपयांची बक्षीसे मिळवली.
नवतर घोडा गाडी शर्यतीत अक्षय साळुंखे, लगमन्ना व इरफान शेख यांच्या गाड्यांनी अनुक्रमे ३००१, २००१, १००१, जनरल घोडा व नवतर पाडा शर्यतीत अनिल गडकरी, महेश पारळे व बंडा खिलारे यांच्या गाड्यांनी अनुक्रम २००१, १५०१, १००१ रुपयांची बक्षिसे मिळवली. जनरल बैल-पाडा शर्यतीत सौरभ कलाकती- कणेरी, विनायक बंडगर – हिरेकुडी व सादिक राज- आजरा यांच्या गाड्यांनी ५००१, ३००१, २००१ रुपये, जनरल घोडा-बैलगाडी शर्यतीत रोहित गडगे-शेडबाळ, अक्षय मिसाळ – भैरेवाडी व विलास मोरे- यमगर्णी यांनी ७००१, ५००१, ३००१ रुपये,जनरल घोडागाडी शर्यतीत अक्षय म्हाळुंगे, ओंकार साळुंखे, राहुल काळे-कोल्हापूर व सोनी प्रेमी निपाणी यांनी ७००१, ५००१, ३००१ रुपयांची बक्षिसे पटकाविली.नवतर घोडागाडी शर्यतीत फंट्या -इचलकरंजी, लगामन्ना- बोरगाववाडी व सदा-निपाणी यांनी ५००१, ३००१, २००१ रुपये, बैलाचा कासरा धरून पळण्यामध्ये उमेश पाटील- चिखलव्हाळ, निवास पाटील- चिखलव्हाळ व संदीप वाघामोडे- अक्कोळ यांच्या बैलांनी २००१, १००१, ७०१ रुपये,घोडेस्वार शर्यतीत सुरेश कागले-यळगूड, सतीश गुणके-यळगूड व पिंटू- गळतगा यांच्या घोड्याने अनुक्रमे १५०१, ७०१, ५०१ रुपयांची बक्षिसे पटकाविली.
प्रारंभी वल्लभ देशपांडे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. यावेळी मलगोडा पाटील, शशी नेसरे, सचिन पोवार, विश्वजीत पाटील, सूरज कुंभार, विनायक पाटील, सचिन मदने, विजय दावणे, आण्णा तांदळे, युवराज पाचुडे, प्रतीक पाटील, नंदकुमार पोवार, जावेद नायकवाडे, अक्षय पाचूडे, किरण सुतार, सतीश मदने, सुनील घोडगेरी, प्रवीण पाटील, अमोल घोडगेरी, डॉ. उमेश मगदूम, रमेश घोडगेरी, किरण पाचूडे यांच्यासह परिसरातील शर्यती शौकीन उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta