निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील १०८ मुनीश्री आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. ११) जाहीर निषेध करण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारी बोरगाव बंदची हाक देण्यात आली आहे. संपूर्ण शहरातून मूक मोर्चा काढून स्वामीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी, संघ, संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी एकदिवशीय बोरगाव बंद पाळावे. व सकाळी ९ वाजता जय शिवराय स्टेज जवळ सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta