निपाणी (वार्ता) : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अध्यात्मिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील निस्सीम, निःस्वार्थ व उल्लेखनीय सेवेबद्दल श्री पंतभक्त मंडळ मुंबई, यांच्यामार्फत अक्कोळ येथील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांना सन २०२३ सालचा जीवन गौरव पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. अभ्युदय एज्युकेशन सोसायटी काळाचौकी- मुंबई येथे हा कार्यक्रम झाला.
यावर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरासह विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास दत्त संस्थान ट्रस्ट कमिटीचे संजीव पंतबाळेकुंद्री, श्री पंतभक्त मंडळ- मुंबई विभागाचे अध्यक्ष महेंद्र भोसले, भीमराव तिप्पे, विश्वनाथ डाकवे, दत्ता सातोसे, महेंद्र सातोसे, सदाशिवराव भोसले, भालचंद्र वांगणेकर, जयेश रेवळेकर, बाळ पाटील, आदित्य कडू आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta