हंचिनाळ : हंचिनाळ (ता. निपाणी) येथे सोमवारी (ता. 10) रात्री रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोगनोळी येथील रहिवासी असलेल्या किरण दत्तात्रेय मसवेकर (वय 39) व श्रेयस अशोक नाईक (व 23) दोघेजण रात्री सव्वा बाराच्या सुमारास कोगनोळीहून हंचिनाळकडे येत असताना. येथील सनी धाबा जवळ असलेल्या वळणावर दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे रस्त्याकडेल्या असलेल्या चरित सिमेंटच्या खांबाला गाडी धडकल्यामुळे किरण म्हसवेकर /मुरगुडेच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे जागीच ठार तर श्रेयश नाईक दोघेही दगडावर पडल्यामुळे गंभीर जखमी झाले असून त्यांना कोल्हापूर येथील खाजगी इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत. श्रेयश नाईक यांनी नव्याने घेतलेल्या केटीएम दुचाकी वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचे घटनास्थळावरून निदर्शनास येत होते
मयत किरण म्हसवेकर उर्फ मुरगुडे याच्या पश्चात आई पत्नी, दोन मुले श्रेयश (वय 16) व समर्थ (वय.14) असा परिवार आहे. दोन्ही मुले लहान वयात पोरकी झाली. त्यामुळे
किरणच्या मयतावर नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
किरण अत्यंत मनमिळावू प्रेमळ व मोठा मित्रपरिवार असलेला युवक होता. शिवाय दोघांचेही निवासस्थान हंचिनाळ मळ्यात असल्यामुळे हंचिनाळ गावाची संपर्क अधिक आहे त्यामुळे कोगनोळी व हंचिनाळ दोन्ही गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ शोक व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta