निपाणी (वार्ता) : सर्पदंशाने खडकलाटच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.१०) सायंकाळी घडली. मालू लक्ष्मण चौगुले (वय ६३) असे या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मुळगाव नवलिहाळ येथील मालू चौगुले या सध्या खडकलाट मधील फुटाणवाडी रस्त्यावर वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी चार वाजता परसबागेमध्ये तन काढत असताना विषारी सर्पाने दंश केला. तात्काळ त्यांना खडकलाट येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी चिक्कोडी येथे दाखल करण्यात आले. पण उपचारला साथ न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत खडकलाट पोलीस ठाण्यात त्यांचे पती लक्ष्मण चौगुले यांनी तक्रार दाखल केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta