राजू पोवार: जिल्हाधिकार्यांकडे मागणी
निपाणी : सरकारने अनेक ठिकाणच्या भुखंडावर परप्रांतीयांना जागा देवून आणि वीज व पाणीपुरवठा सोयीसवलती कमी दर देवून त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे किराणा दुकान, हार्डवेअर, सॅनिटरी, मोबाईल शॉप, बांधकाम व्यावसायिक, फळे व भाजीपाला, फर्निचर, मिठाई, हॉटेल, कापड उद्योग अशा सर्वच ठिकाणी परप्रांतीयांचे जाळे निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक बेरोजगार युवक, व्यवसायकानाही प्राधान्य देण्याची मागणी चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी केली आहे.
सर्वत्र परप्रांतीय उद्योग, व्यवसाय करीत असताना येथील स्थानिक भूमिपुत्र मात्र कर्ज आणि बेरोजगारी, महागाई यात भरडला जात आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने आता जनतेचा अंत न बघता जे उद्योग व्यवसाय आहेत त्यामध्ये 90 ते 95% स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे नेते व चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी जिल्हाधिकारी हिरेमठ यांच्याकडे केली आहे. या प्रश्नावर लवकरच तोडगा निघाला नाही तर येणार्या विधानसभा बेळगाव येथील अधिवेशनात जोरदार आंदोलन करण्याचा इशारा दिला. राजू पोवार यांच्या भूमिकेमुळे स्थानिक बेरोजगारांमध्ये आशेचा किरण दिसत आहे.
यावेळी रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष चन्नाप्पा पुजारी, कार्यदर्शी प्रकाश नाईक, निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, सुभाष नाईक, प्रवीण सूतळे, बाळासाहेब हादीकर, कल्लाप्पा कोटगे, राजू नाईक, सुनील गाडिवड्डर यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
