खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात रस्ता, गटारीच्या समस्या नेहमीच भेडसावित आहे.
याकडे खानापूर नगरपंचायतीचे तसेच या भागाच्या नगरसेवकांचे साफ दुर्लक्ष होत आहे.
विद्यानगरातील रहिवाशाना गेल्या कित्येक वर्षापासून रस्ताच नाही. त्यामुळे सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात विद्यानगरात रस्त्यावर चिखलातून ये-जा करणे सर्वानाच त्रासाचे झाले आहे.
विद्यानगरात गटारीची समस्या
रस्त्याप्रमाणेच गटारीचीही समस्या नेहमीच विद्यानगरात भडसावित आहे. गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच डुक्कराची वर्दळही वाढली आहे. त्यामुळे डुक्करापासून नागरिकांना त्रास संभवत आहे.
विद्यानगराच्या रस्त्यावर कचर्याचे ढीग जागोजागी पसरले आहेत. याकडे नगरपंचायतींचे साफ दुर्लक्ष झाले आहे. खानापूर शहरातील विद्यानगरातील समस्याकडे आतातरी लक्ष देतील काय? असा सवाल नागरिकातून विचारला जात आहे.
