Wednesday , March 4 2026
Breaking News

दोषींवर कठोर कारवाईसह मुनी महाराजांना सुरक्षा द्या

Spread the love

 

लक्ष्मीसेन महाराज; निपाणीत मूक मोर्चाने तहसीलदारांना निवेदन

निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात साधुसंत आणि मुनी महाराजांच्या वर हल्ले वाढले आहेत. ही बाब खेदजनक अशीच आहे. हिरेकुडी येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्यासह साधु, संत, मुनी महाराजांना शासनाने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी कोल्हापूर येथील लक्ष्मी सेन महाराज यांनी केली.
हिरेकुडी येथील आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांची हिरेकुडी येथे झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेध करण्यासाठी निपाणी येथे बुधवारी (ता.१२) सकाळी समस्त जैन समाज आणि विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रांततर्फे मूक मोर्चा काढून तहसीलदार विजय कडकोळ यांना निवेदन देण्यात आले.
लक्ष्मी सेन महाराज म्हणाले, अशा मानवी घटनांना पाय बंद घालण्यासाठी शासनाने कडक कायदे करावेत. साधु, संत आणि मुनी मानव जातीच्या कल्याणासाठी कार्यरत असताना त्यांच्यावर हल्ले करणे चुकीचे आहे. या पुढील काळात समाज बांधवांनी जागृत राहून या पुढील काळात अशा घटना घडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
सकाळी अकरा वाजता येथील गांधी चौकातून कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन महाराज येथील श्री. विरूपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधीश व विश्व हिंदू परिषदचे जिल्हा अध्यक्ष प्राणलिंग स्वामी, शेंडूर येथील ॐशक्ती मठातील अरुणानंद तीर्थ स्वामी, तमनाकवाडा येथील श्री दत्तपीठाचे सद्गुरु सच्चिदानंद बाबा,प्रभूलिंग स्वामींच्या मार्गदर्शनखाली या मुकमोर्चाला प्रारंभ झाला.गांधी चौक, कोठीवाले कॉर्नर, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल, जुना पी.बी. रोड नगरपलिका कार्यालय मार्गे तहसीलदार कार्यालयात मोर्चा पोहचला. तेथे तहसीलदार कडकोळ यांना स्वामी व महाराजांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. तहसीलदार कडकोळ यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठ मार्फत मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
मोर्चामध्ये नगराध्यक्ष जयवंत भाटले, नगरसेवक राजू गुंदेशा, अरुण खोडबोळे, विलास उपाध्ये, रवींद्र श्रीपण्णावर, प्रशांत गुंडे, आकाश शेट्टी, आशिष खोडबोळे, मिलिंद मेहता, प्रकाश शहा, सतीश वखारिया, राजेंद्र कंगळे, रितेश शहा, सुरज राठोड, डॉ. राजेश बनवन्ना राजेश आवटे, प्रतीक शहा, राजू मेहता शशी कुमार गोरवाडे, अरविंद शहा, कांतीलाल कोठडीया, निलेश शहा संजय संकेश्वरे, निलेश शेटे, वकील शितल मेकळक्की, राजेश कोठडीया, अक्षय पुरंत, चेतन लगारे, अभय मानवी, प्रणव मानवी, नितीन शहा, सोनाली उपाध्ये, सोनल कोठडीया, प्रा. कांचन बिरनाळे यांच्यासह जैन समाज बांधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *