अचानक घडलेल्या घटनेमुळे खळबळ
निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी, बुदलमुख, पांगिरे-बी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी गुरुवारी (ता.२०) निवडणूक होत आहे. अशावेळी अध्यक्षपदाच्या दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या रेश्मा संदीप डाफळे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम व युवा उद्योजक रोहन साळवे यांनी त्यांच्या गळ्यात पक्षाचा स्कार्फ घालून स्वागत केले.
ग्रामपंचायत सदस्या रेश्मा डाफळे म्हणाल्या, आपण काँग्रेस पॅनल म्हणून निवडून आलो. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी अनवधानाने आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ती चूक कळून आल्याने आपण पुन्हा काँग्रेस प्रवेश केला आहे. माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण यापुढे कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम म्हणाले, राज्यात काँग्रेस सत्तेत आल्याने ग्रामपंचायतींना अधिक निधी मिळून विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे सदस्यांचा काँग्रेस प्रवेश होत असल्याचे सांगितले.
रोहन साळवे यांनी, परिस्थिती कशीही असली तरी पक्षनेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास असणे आवश्यक आहे. यापुढील काळातही कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुकांची दुरुस्ती करून काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी एल. जी. हजारे, अंकुश चव्हाण, संदीप डाफळे, पांडुरंग डाफळे, राजेश बुवा, प्रदीप मोकाशी, रावसाहेब गुरव, सुरेश मोकाशी, विवेक मोकाशी, भरत रोड्डे, धनाजी जाधव, योगेश बुवा, भुजंग रक्ताडे, विशाल डाफळे, ओंकार रानमळे, रमेश नाईक, उत्तम रक्ताडे, सुधाकर मादनाळे, रमेश कांबळे, सदाशिव म्हाकवे, प्रदीप मोकाशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta