कोगनोळीसह सीमाभागातील चित्र
कोगनोळी : पावसाळ्यात हिरवा चारा येईपर्यंतचे तरतूद म्हणून गोळा केलेल्या सुक्या चाऱ्याचा साठा संपत आल्याने कोगनोळी पंचक्रोशीतील शेतकरी चिंतेत आहेत. भागातील जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात चारा पुरविणाऱ्या या भागातील पशुधनाची चाऱ्याअभावी हेळसांड होणार असून याचा दुग्ध व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
चाऱ्यासाठी या परिसरात पोषक हवामान असल्याने शेतकऱ्यांनी शेतीला जोड म्हणून दुग्धोत्पादन व्यवसायाला पसंती दिली आहे. जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हैशी पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. विविध दूध संस्थांमार्फत परिसरातून दूध संकलन केले जाते. हा व्यवसाय सांभाळताना पशुपालकांना चाऱ्याचे नियोजन काळजीपूर्वक करावे लागते.
भरपूर पावसाचा परिसर असल्याने डोंगर, माळरान, नदीकाठ शिवारातील बांधावर मोठ्या प्रमाणात गवत वाढते. संपूर्ण उन्हाळा आणि पावसाळा सुरु होईपर्यंतचा पाच-सहा महिन्यांचा कालावधी शेतकऱ्यांसाठी असतो. खूप महत्त्वाच्या कालावधीसाठी जनावरांच्या चाऱ्याची तरतूद म्हणून डोंगरात वाढलेले गवत उन्हाळ्याच्या तोंडावर कापून त्याचा साठा करुन ठेवला जातो. संकरित ज्वारी, शाळूचा कडबा आणि भात मळणीतून निघालेले पिंजर हे गंजी लावून ठेवले जाते. पावसाळ्यात हिरवा चारा येईपर्यंतचे तरतूद म्हणून ठेवलेल्या सुक्या चाऱ्याचा साठा संपत आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta