Friday , February 7 2025
Breaking News

दत्त कारखान्यातर्फे बोरगांवमध्ये ’शुगर बीट’ शेती!

Spread the love

कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर लागवड : एफआरपीप्रमाणे देणार दर
निपाणी : अतिवृष्टी आणि महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने शुगर बीट लागवडीचा नवा पॅटर्न आणला आहे. बोरगाव कार्यक्षेत्रात सुमारे 5 एकरहून अधिक तर कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर शुगर बीटची लागवड करण्यात आलेली आहे.
केवळ चर्चाच न करता महापूर ओसरल्यावर त्यांनी कार्यक्षेत्रातील 41 गावांमध्ये शुगर बीटची लागवड केली आहे. शिवाय या शेतकर्‍यांना एफआरपीप्रमाणे दर मिळणार आहे.
शिरोळ येथील दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या 56 सभासदांच्या शेतीवर शुगर बीट लागवड झाली आहे. बोरगावसह बेडकीहाळ, सदलगा या ठिकाणीही शुगर बीटचे लागवड करण्यात आलेली आहे. सध्या पीक वाढीच्या अवस्थेत असून या शुगर बीटचे गाळप मार्च मध्याला करण्यात येणार आहे. चार महिन्यांपूर्वी आलेल्या महापुराने ऊस शेतीला फटका बसला. नुकतीच लागवड झालेली ऊस शेती पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. काही वर्षापासून सातत्याने पूर येत असल्याने शेतीचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कारखान्याने दोन महिन्यापूर्वी सदस्यांच्या उपस्थितीत पीक बदलाबाबत एक चर्चासत्र घेतले होते. त्यातून शुगर बीटचा पर्याय पुढे आला होता. कारखान्यांनीही योजना तातडीने प्रत्यक्षात अमलात आणले. या अनुषंगाने बोरगाव येथे काही शेतकरी शुगर बीट लागवडकडे वळले आहेत. यासाठी लागणारे बियाणे कारखान्याकडून देण्यात आली असून कीडनाशके व औषधांचाही पुरवठा कारखाना वतीने करण्यात येत आहे.
प्रयोगशील शेतकरी आणि विविध प्रकारच्या जमिनी निवडल्या. यात क्षारपड, काळी व माळरानाच्या जमिनीचाही समावेश आहे. हा प्रयोग करताना ठिबक सिंचन व पाटपाणी हे दोन्ही पर्याय शेतकर्‍यांना दिले आहेत. हे पीक नवीनच असल्याने प्रत्येक पातळीवर कारखान्याचे ऊस विकास विभागाबरोबरच माती परीक्षण प्रयोगशाळेची तज्ञ शेतकर्‍याला रोजचे मार्गदर्शन करीत आहेत. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनीही प्रत्यक्षात शेतीला भेट देऊन पाहणी करत आहेत.

’काही वर्षापासून पुराच्या नुकसानीने शिरोळ तालुक्यासह निपाणी तालुक्यातील काही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्याला पर्याय देण्यासाठी आम्ही हे पीक निवडले. सद्यस्थितीत पिकाची वाढ चांगली होत आहे, हे आमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. शेतकर्‍यांबरोबर कारखान्याचे कर्मचारी यासाठी मेहनत घेत आहेत. सध्या सर्व बाबींचे नियमित निरीक्षण करून तांत्रिक अभ्यास करीत आहोत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पूरग्रस्त शेतकर्‍यांना पर्याय मिळणार आहे. हंगामाच्या शेवटी यंदा उत्पादन होणारे सर्व शुगर बीट गाळप करणार आहोत.’
– गणपतराव पाटील, अध्यक्ष दत्त शुगर्स, शिरोळ
—-
’गेल्या दोन-तीन वर्षापासून नदी काठावरील शेतकर्‍यांना महापुराचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतीसह ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याला पर्याय म्हणून दत्त कारखान्याच्या वतीने शुगर बीट शेतीचे सुरुवात केली आहे. यातून आपणास आर्थिक उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे. सध्या पिकाचे वाढ पाहिल्यास समाधानकारक आहे. शुगर बिट शेती प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात सर्वच पूरग्रस्त शेतकर्‍यांना व नदी काठावरील शेतकर्‍यांना हा उत्पन्न वाढीचा एक साधन बनणार आहे.’
बाबासाहेब गोरवाडे, शुगर बीट उत्पादक शेतकरी, बोरगाव.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आप्पाचीवाडीत मंगळवारी मोफत सीईटी फॉर्म

Spread the love  निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, कुरली, हदनाळ, भाटनांगनूर, सुळगाव, मतिवडेसह निपाणी तालुक्यातील बारावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *