Friday , November 6 2026
Breaking News

विधानपरिषद निवडणूक सुरळीत पार पाडा

Spread the love

मोहन भस्मे : निपाणी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम
निपाणी : शुक्रवारी (ता. 10) होणार्‍या विधान परिषद निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी केले. येथील केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी कॉलेजमध्ये आयोजित पीआरओ व एपीआरओ निवडणूक कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देताना ते बोलत होते.
प्रारंभी उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे यांनी स्वागत केले. तहसीलदार भस्मे म्हणाले, विधान परिषद निवडणूक महत्त्वाची आहे. निपाणी तालुक्यात जिल्हा पंचायत वगळता तालुका पंचायत, ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिका नगरसेवक यांना मतदानाचा अधिकार आहे. ही मतदान प्रक्रिया ज्या त्या ठिकाणी पार पाडली जाणार आहे. त्यासाठी निपाणी तालुक्यात एकूण 28 बुथवर मतदार प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी निपाणी तालुक्यात 534 मतदार आहेत. सर्व मतदारांचे मतदान निवडणूक कर्मचार्‍यांनी सुरळीतपणे करून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे सांगितले.
यावेळी उपस्थित प्रशिक्षित कर्मचार्‍यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. हे प्रशिक्षण दोन टप्प्यात झाले. यावेळी बोलताना प्रशिक्षणार्थी तहसीलदार सदाशिव माकोजी यांन, मतदारांना प्रथम पसंतीची तीन मते देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मतदारानीही मत पत्रिकेवर 1,2,3 असे पेनाने लिहून मतदान करावे, असे सांगितले. यावेळी उपतहसीलदार अभिजीत बोंगाळे यांनी तालुका प्रशासनाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. या शिबिरास एकूण 80 कर्मचार्‍यांसह प्रशिक्षणार्थी म्हणून सी. ए. कुंभार, एस. जी. कुंभार, लक्ष्मण कोणे यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जेलभरो आंदोलनासाठी जाणाऱ्या ‘रयत’च्या कार्यकर्त्यांना निपाणी पोलिसांनी रोखले

Spread the love    निपाणी (वार्ता) : यंदा सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने ऊसासह अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *