समता सैनिक दलातर्फे अभिवादन
निपाणी : निपाणी परिसर हा क्रांतिकारकांचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. अजूनही काही प्रमाणात दलित, शोषित, पीडित आणि शेतकर्यांवर अन्याय सुरुच आहे. त्यामुळे समाजात बदल करण्यासाठी तरुणांची फौज आवश्यक आहे. सामान्य माणूस हाच क्रांतीचा आधार आहे. 70 वर्षानंतर हे अपेक्षित स्वातंत्र्य मिळालेले नाही. त्यामुळे दुसर्या स्वातंत्र्याची गरज आहे. देशामध्ये समानता आली तरच लोकशाही अबाधित राहणार आहे. त्यासाठी समाजातील व्यवस्थेचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे, असे मत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले.
येथील समता सैनिक दलातर्फे नगरपालिका जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माने बोलत होते.
प्रारंभी डॉ. माने व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा. शरद कांबळे म्हणाले, समाजात अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली आहे. निपाणी तालुक्यातर्फे अनेक उपक्रम राबवून समाजातील अनेकांना न्याय मिळवून दिला जात आहे. समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी बौद्ध धम्माची आंबेडकरांनी स्थापना केली. त्यातून या पुढील काळातही चांगले काम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे यांनी, मातृ संघटनेचे काम प्रत्येकाने तळमळीने केले पाहिजे त्यासाठी जाणीव व उत्तरदायित्व असणे आवश्यक आहे समता सैनिकांचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आजच्या तरूणावर आहे. त्याशिवाय संघटना वाढीसाठी व बळकटीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. गणित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोककुमार असोदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सामूहिक त्रिशरण पंचशील सादर करण्यात आले. त्यानंतर समता दल कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमास प्रा. जे. डी. कांबळे, अॅड. अविनाश कट्टी, रिपाईचे राज्य सचिव महादेव कांबळे, लहू मधाळे, पी. टी. कांबळे, अॅड. राहुल वराळे, कुमार कांबळे, एसीएसटी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील शेवाळे, हिटलर माळगे, विठ्ठल वाघमोडे, संजय कांबळे, प्रा. सुरेश कांबळे यांच्यासह समता सैनिक दलाचे कार्यकर्ते व भीमसैनिक उपस्थित होते.
Check Also
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे
Spread the love पाणी प्रश्नासाठी आत्मक्लेष आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयातून येणार कमिटी निपाणी (वार्ता) : येथील …