राजेंद्र वडर : गळतगा येथे अण्णाभाऊ साठे जयंती
निपाणी (वार्ता) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला पोषक तर होतेच. शिवाय त्यांनी समाजाच्या सुधारणेसाठी नेहमीच कार्य केले आहे. आपल्या शाहिरीतून त्यांनी समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपराना बंद केल्या. आजही त्यांचे आचार, विचार आणि संस्कार समाजाला प्रेरणादायी ठरतात. फक्त त्यांची जयंती करून चालणार नाही तर त्यांचे विचार प्रत्येकांनी नेहमी आपल्या जीवनात वापरल्यास त्यांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे, मत माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर- पवार यांनी व्यक्त केले. ते गळतगा येथील मातंग समाज तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित शाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती प्रसंगी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अध्यक्ष अलगोडा पाटील, संतोष हुनसे हे उपस्थित होते.
प्रारंभी राजेंद्र वडर व इतर मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यानंतर ग्रामपंचायत अध्यक्षपदी अलगोडा पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी लक्कवा संतोष हुनसे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला.
राजेंद्र वडर म्हणाले, गावातील मातंग समाज अद्याप सुधारणे पासून वंचित आहे. ग्रामपंचायत च्या माध्यमातून समाजात विकास कामे हाती घेऊन शासनांकडून येणारे प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी प्रयत्न करावे असे सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून आण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची माहिती दिली.
यावेळी संतोष हुनसे, बाबासाहेब जाधव, लक्ष्मण शिपुरे, रवि वडर, श्रावण ऐहोळे, तातोबा सनदी, कल्लाप्पा केंगारे, मारुती सनदी, ऍड. सुनिल पुजारी, मातंग समाज तरुण मंडळाचे अध्यक्ष भरमा केंगारे, भरत शहामाने, राहुल यरनाळे, गणेश केंगारे, अनिल पुजारी, तातोबा केंगारे आदींसह मातंग समाजाचे नागरिक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta