कोगनोळीत प्रचार सभा
कोगनोळी : बेळगाव जिल्ह्यातील सर्व नेत्यांची एकजुटीमुळे काँग्रेसचा विजय निश्चित आहे. युवा नेतृत्वाला संधी मिळावी म्हणूनच आपण या निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चन्नराज हट्टीहोळी युवा उमेदवार असून त्यांनी कोरोना काळात व पूरग्रस्त काळात जिल्ह्यात अनेक कामे केली आहेत.
येणार्या या विधान परिषद निवडणुकीत पहिल्या पसंतीचे मत देऊन निवडून देण्याचे आवाहन केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आमदार काकासाहेब पाटील होते. यावेळी व्यासपीठावर बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील आदी उपस्थित होते.
के. डी. पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार झाला.
लक्ष्मणराव चिंगळे सर म्हणाले, भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर आणले आहे. सध्या परिस्थिती पाहता काँग्रेसला सत्तेवर येणे काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले.
प्राध्यापक सुभाष जोशी म्हणाले, सर्व नेत्यांनी एकजुटीने विजयासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित आहे.
माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, भाजप हा पक्ष लोकशाहीविरोधी असून संविधान बदलण्याचे काम करत आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक कंपन्यांचे खाजगीकरण केले आहे. कार्यकर्ते व नेते यांच्यातील उत्साह वाढवणारी ही निवडणूक असून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी चन्नराज हट्टीहोळी यांचे नाव सुचवले आहे. जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी विजयासाठी एकजुटीने राबत असल्याने विजय निश्चित आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता चन्नराज हट्टीहोळी यांना निवडून द्यावे असे त्यांनी आवाहन केले.
या सभेला माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाचे चेअरमन अनिल चौगुले, केशव पाटील, शरद पाटील, बाबुराव खोत, नेताजी पाटील, शशी पाटील, दगडू नाईक, बशीर गडवाले, जहांगीर कमते, सलिम गडवाले, संभाजी पाटील, अमर शिंत्रे, अरुण निकाडे, बाबुराव मगदूम, राजगोंडा पाटील, सचिन खोत, तात्यासाहेब कागले, विश्वजीत लोखंडे, बिरसू कोळेकर, युवराज कोळी, सुभाष पाटील, अनिल पाटील, सुकुमार वडर, प्रवीण भोसले, महेश जाधव, राजू शिंत्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
