Wednesday , December 10 2025
Breaking News

दैवतांच्या सर्व रूपांमध्ये एकच आत्मचैतन्य : परमात्मराज महाराज

Spread the love

 

आडी दत्त मंदिरातील नवीन चांदीची वेदी

निपाणी (वार्ता) : कोणत्याही देवतेची भक्ती केल्यास ती मधुरतेकडेच नेणारी आहे. दैवतांच्या सर्व रूपांमध्येएकच एक आत्मचैतन्य आहे,असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले.
ते आडी संजीवनगिरी वरील श्रीदत देवस्थान मठात वेदिकासंस्थित पादुकांच्या महापूजेच्या निमित्ताने बोलत होते.
यावेळी श्री दत्तगुरूंच्या नवीन सिल्व्हर इन्स्टिट्यूट रौप्य पादुकांना अभिषेक अर्पण त्र्यंबक जोशी व दिपकराव कदम यांच्या हस्ते
पादुकांची महापूजा करण्यात आली. त्यानंतरमहाआरती करण्यात आली. यावेळी प्रथमतः परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते
चरणपादुकाच्या पूजेसाठी स्थापना केली.
परत्मराज महाराज म्हणाले, नवविधा भक्तीमध्ये श्रवण, अर्चन, नामस्मरण, पादसेवन, आत्मनिवेदन इत्यादी प्रकार सांगितले आहेत. या वेगवेगळ्या प्रकारांव्दारे भक्ती केली तरी भक्तीची एकच मधुरता प्राप्त होते. चरण पूजेचे अनन्य साधारण महत्व आहे. विष्णू पूजेवेळी शाळिग्राम, महेशाची पूजा करताना लिंगपूजा केली जाते. तद्वतच दतगुरूंची पूजाचरणकमल चिन्हांच्या रूपात करण्याची वहिवाट आहे.
मंदिरादी प्रार्थनागृहांमुळे कितीतरी लोकांची पोट भरतात, हे महामारीच्या काळात कळून आले. मंदिर परिसरामध्ये चालणारे अनेक व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे तशा अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. मंदिर परिसरामध्ये व्यवसाय करणाऱ्या अनेकांची पोटं भरली जातात. त्यामुळे मंदिरामध्येकेल्या जाणाऱ्या भक्तीच्या विविध प्रकारांचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच नामस्मरणरूप भक्तीने उद्धार होत असला तरी अन्य प्रकारांना विरोध नको. चरणसेवारूप भक्ती विनम्रता निर्माण करते. अभिमानाने माणूस बनतो. म्हणून चरण चिन्हांची पूजा करण्याची वहिवाट आहे.
सगळी रूपे एकच आहेत असे अव्दैत वेदान्त सांगतो. सर्व रूपांमध्ये एकच चैतन्य आहे. हयग्रीव, कार्तिकस्वामी आदी काही दैवतांची मंदिरे सर्वत्र नसतात. तेव्हा त्या दैवतांचे आपल्या आराध्य दैवताला पाहू शकतात.
यावेळी रौप्यवेदिका संस्थित रौप्यपादुकांचे देणगीदार दिपकराव कदम व दिपाली कदम यांचा तसेच अविनाश जोशी, पुराणिक व विकास जोशी यांचा परमात्मराज महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाविकांनी महापूजा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *