संकेश्वर (प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणुकीत बेळगांव जिल्ह्यात भाजपाचे उमेदवार महांतेश कवटगीमठ पहिल्या प्राधान्य मतांनी विजयी होणार असल्याचे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी संकेश्वरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले, महांतेश कवटगीमठ यांना जिल्ह्यात सर्वत्र चांगले मतदान झाले आहे. किमान 1500 मताधिक्याने त्यांचा विजयी निश्चित आहे. निवडणुकीत पैशाचा घोडेबाजार चालला तरी भाजपाच्या एकनिष्ठ पालिका, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनी आपले अमुल्य मत भाजपाचे उमेदवार महांतेश यांना देऊन आपली पक्षनिष्ठा दाखवून दिली आहे. विधानपरिषद निवडणूक प्रचारात भाजपाने आघाडी प्रस्थापित केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रचारात भाजपाचे महांतेश कवटगीमठ मागे पडल्याची केवळ अफवा पसरविली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. बेळगांव जिल्ह्यातील भाजपाच्या 13 आमदारांनी दोघा खासदारांनी आणि भाजपा पदाधिकार्यांनी प्रचाराची धुरा व्यवस्थितपणे पार पाडून दाखविली आहे. निवडणुकीत महांतेश कवटगीमठ यांच्या विरोधात कोणी प्रतिस्पर्धी होता असे चित्र कांही दिसले नाही.
काँग्रेस-अपक्ष उमेदवारांत लढत
दुसर्या मतांसाठी काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी आणि अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्यात मोठी चुरस दिसून आली आहे. त्यामुळे दुसर्या मतांवर कोण विजयी होणार ते पहावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संकेश्वर पालिकेच्या सदस्यांसह मंत्रीमहोदयांनी महांतेश कवटगीमठ विजयी झाल्याचे दर्शविली.
यावेळी उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, सचिन भोपळे, डॉ. मंदार हावळ, गंगाराम भूसगोळ, अॅड. प्रमोद होसमनी, हारुण मुल्ला, विवेक क्वळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, गजानन क्वळी, महेश सुगते उपस्थित होते.
हुक्केरी मतक्षेत्रात 100% मतदान
हुक्केरी मतक्षेत्रातील संकेश्वर पालिका, हुक्केरी पट्टणपंचायत आणि ग्रामपंचायतच्या सर्व 931 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदान 100 % झाल्याचे निवडणूक निर्वाचिन अधिकारी यांनी घोषित केले. सकाळच्या सत्रात सकाळी 10 वाजता केवळ 24 मतदारांनी हक्क बजावला होता. दुपारी 12 वाजता 261 मतदारांनी तर दुपारी 2 वाजता 661 सदस्यांनी आणि सायंकाळी 4 वाजता 931 सर्व सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला दिसला.
मतांचं मोल
निवडणुकीचा प्रचार जसा रंगू लागला तशी आमका उमेदवार एवढे पैसे देणार, तमक्याने सोन्याच्या अंगठीची ऑफर केलीय हीच चर्चा ऐकावयास मिळाली होती. आज मतदानाचा हक्क बजावितांना सदस्य खूश दिसले. त्यामुळे सदस्यांची कमाई चांगली झाल्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
Check Also
बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द
Spread the love उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …