१० ते २० टक्क्यांनी राख्या महागल्या
निपाणी (वार्ता) : बहीण-भावांचे नाते अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन सण २ दिवसांवर येऊन ठेपल्याने निपाणी शहर व ग्रामीण भागातील बाजारपेठेत विविध रंग आणि नक्षीच्या राख्यांनी दुकाने सजली आहेत. विविध रंगांच्या सुती धाग्यापासून या राख्या बनविण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध आकार आणि डिझाईनचे मनी, मोती, रुद्राक्ष, स्वस्तिक यांचा खुबीने वापर करून या राख्या लक्षवेधी आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरतील, याची काळजी राखी उत्पादकांनी घेतली आहे. विशेष करून ग्रामीण भागातील महिला ग्राहकांना या राख्या आवडत आहेत.
यंदा बाजारात फॅन्सी, खड्यांच्या आणि जरीच्या राख्या बाजारात आल्या आहेत. पाच रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत या राख्यांच्या किमती आहेत. राखी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाल्याने यंदा दहा ते वीस टक्क्यांनी राख्या महागल्या आहेत.
जनरल स्टोअर्स, बांगड्यांची
दुकाने आणि आठवडी बाजारात राख्या विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. मनमोहक विविध रंगी राख्याग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. निपाणी सह परिसरातील छोट्या-छोट्या गावांमधील दुकानांनी राख्या ग्राहकांचे लक्ष वेधीत आहेत. बच्चे कंपनीला आकर्षित करणाऱ्या कार्टून्सच्या राख्याही दुकानांमध्ये पाहायला मिळत आहेत.
—————————————————————–
‘खड्यांच्या राख्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. एका सिझनला छोट्या व्यावसायिकांची तीस ते चाळीस हजारांची उलाढाल राखी विक्रीत होते. यावर्षीही राख्यांना चांगली मागणी आहे.’
-वैशाली माने, राखी विक्रेत्या महिला, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta