निपाणी (वार्ता) : भारतातील चांद्रयान-३ ची मोहीम यशस्वी ठरली. या यानाचा विक्रम हा लँडर चंद्रावर उतरताच संपूर्ण भारतीयांनी जल्लोष साजरा केला. या मोहिमेचा भाग असलेले इस्रोचे शास्त्रज्ञ आणि आडी येथील रहिवासी चिदानंद मगदूम यांचा येथील कोल्हापूर वेस व्यापारी मित्र मंडळातर्फे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासुद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चिदानंद मगदूम यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच चंद्रयान मोहिमेबद्दल सविस्तर माहिती सांगितली. चंद्रकांत जासूद यांनी, चंद्रयान मोहिमेमध्ये आडी येथील चिदानंद मगदूम आणि केरबा लोहार या शास्त्रज्ञांनी केलेली कामगिरी अभिमानास्पद इतर युवकांनी त्यांचा आदर्श घेऊन भावी जीवनात वाटचाल करण्याचे आवाहन केले.
यावेळी हरीश जासूद, संदेश सूर्यवंशी, पुरुषोत्तम तासगावकर, सजय सूर्यवंशी, प्रथमेश जासूद, राजू शिंदे, केतन माने, यश देव, प्रशांत तासगावकर, नितीन परीट, कुमार कमते, योगेंद्र शहा, बजरंग पाटील, शब्बीर माणगावकर यांच्यासह कोल्हापूर वेस व्यापारी मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta