Wednesday , March 4 2026
Breaking News

शिवमंदिरात तिसऱ्या सोमवारीही भाविकांची गर्दी

Spread the love

 

मंदिरात विद्युत रोषणाई ; साबुदाणा खिचडीचे वाटप
निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारीही (ता.४) शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात मंदिरासह इतर मंदिरात ‘हर हर महादेव’चा गजर दिवसभर सुरू होता. महादेव गल्लीतील महादेव मंदिरात नितीन गुरव, सचिन सुतार, किरण भालेभालदार व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पूजा बांधली होती. तर शेतकऱ्यांनी मंदिराची सजावट केली होती. श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार दांपत्यासह भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर अरुण जासूद सोमशेखर संजय कोठीवाले, सतीश फुटाणे यांच्यातर्फे प्रसादाचे वाटप झाले. सायंकाळी सुरज सुतार दाम्पत्यांच्या हस्ते वरद शंकर पूजा पार पडली. त्यानंतर रात्री पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी माजी सभापती सुनील पाटील, अनिल पाटील, अमर बागेवाडी, चंद्रकांत तारळे, हालशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, सदानंद दुमाले, इराण्णा शिरगावे, महादेव पाटील, बाबासाहेब साजनावर, रवींद्र चंद्रकुडे, संजय मोळवाडे, समीर बागेवाडी, महेश दिवाण यांच्यासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते व नीलंबिका महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित शिप्पूर येथील रामलिंग मंदिर, मंगळवार पेठेतील महादेव मंदिर या ठिकाणी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांची दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव येथील धनगरी ढोलवादन स्पर्धेत निडगुंदी येथील ‘बेंकी बबलादी’ मंडळ सर्वोत्तम

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील वाशीखान वालुग मंडळातर्फे वाशिखान मंदिरात सहकाररत्न उत्तम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *