Wednesday , March 4 2026
Breaking News

नूतन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. गुळेद यांचा रयत संघटनेतर्फे सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची अन्यत्र बदली झाली आहे. त्यांच्या जागी डॉ. भीमाशंकर गुळेद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त डॉ. गुळेद आणि मावळते जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. पाटील यांचा चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे राजू पोवार, चुन्नापा पुजारी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. गुळेद यांनी, सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या पुढील काळात संघटनेच्या कार्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. राजू पोवार यांनी, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडण्याच्या दृष्टीने संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी या पुढील काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रकाश नाईक, शिवानंद मोगलीहाळ, संजू हब्बनावर, कलगोंडा कोटगे, बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, सर्जेराव हेगडे, सागर पाटील, बबन जामदार, एकनाथ सादळकर, शिवाजी वाडेकर, संजय नाईक, पप्पू जाधव, संजय पोवार, प्रा. हालाप्पा ढवणे, नितीन वाडेकर, महावीर चौगुले यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *