संचालक राजेश कदम : संस्थेची वार्षिक २२ वी सभा
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात पतसंस्था चालवणे कठीण झाले असताना सर्वांच्या सहकार्यामुळे ओम बालाजी क्रेडिट सौहार्द संस्थेची प्रगती होत आहे. संस्थेचे २६१५ सभासद, १३ लाख ६९ हजाराचे भांडवल, १२ कोटी ४४ लाख ठेवी ६ कोटी ६४ लाख कर्ज वाटप, ६० लाख २९ हजार निधी, ७ कोटी २७ लाख गुंतवणूक करून संस्थेस आर्थिक सालामध्ये १४ लाख ३५ हजारचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे संचालक राजेश सूर्याजी कदम यांनी दिली. संस्थेचा वर्धापन दिन आणि वार्षिक सभा शनिवारी (ता.९) सकाळी झाली. यावेळी प्राणलिंग स्वामी, अनिकेत रमेश कुलकर्णी-महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, नगराध्यक्ष व हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे नूतन संचालक जयवंत भाटले होते.
संस्थेचे संचालक महादेव नागावकर दांपत्यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा झाली. संस्थेचे उपाध्यक्ष विष्णू कुणकेकर यांनी स्वागत केले. यावेळी हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत भाटले, हाल शुगर संचालक, सभापती राजू गुंदेशा, भारतीय सैन्यात भरती झाल्याबद्दल नऊ उमेदवारांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष नगराध्यक्ष जयवंत भाटले व संचालकांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी संस्थेस भेट दिली.
कार्यक्रमास संचालक सुभाष भाटले, बाळासाहेब पालकर, भिकाजी शिंदे, सुनील वरुटे, अनिता भाटले, कल्पना कुराडे, दीपक माने, सल्लागार विश्वनाथ भाटले, सुधाकर कुराडे, रमेश वैद्य, निलेश पठाडे, सभापती राजू गुंदेशा, प्रवीण भाटले -सडोलकर, नगरसेवक सद्दाम नगराजी, सुजाता कदम, संतोष सांगावकर, अमोल माळी, धनाजी भाटले, संतोष माने, महेश सूर्यवंशी, राजेश कोठडीया, रवींद्र इंगवले, उदय नाईक, किशोर चव्हाण, सागर मिरजे, संदीप वाडकर, आशा टवळे, दत्ता जोत्रे, अमित रणदिवे, बंडा घोरपडे, अभय मानवी, प्रकाश तारळे, बाळासाहेब जोरापुरे, विकास वासुदेव, कल्पना बोंगाळे, अरुण काशीदकर, सूरज खवरे, दिलिप चव्हाण, विजय टवळे, बाबासाहेब ढेकळे, विक्रम देसाई, उदय कदम यांच्यासह कर्मचारी, सभासद उपस्थित होते. अरुण बेलेकर यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ कडकणे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta