डॉ. एस. आर. पाटील; 33 वी वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात महात्मा बसवेश्वर संस्थेचे कार्य सर्वत्र विखुरले आहे. संस्थेच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासले जात असून संस्थेमध्ये अनेक नवनवीन योजना सुरू केली आहेत. त्याचा लाभ सर्वांना मिळत आहे. नि:स्वार्थी संचालक मंडळ आणि प्रामाणिक कर्मचारी वर्गामुळे संस्थेला यंदा 8 कोटी 31 लाख रुपये निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंकरगौडा पाटील यांनी दिली.
श्री.महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी(ता.10) झाली. यावेळी श्री विरूपाक्ष लिंग समाधी मठाचे श्री. प्राणलिंग स्वामींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पाटील म्हणाले,संस्थेचे 14,724 ‘अ’ सभासद असून 4,550 ‘ब’ वर्ग सभासद आहेत. भाग भांडवल 65,09,200,राखीव निधी 45, 47,74,22, ठेवी 425,23,59,279 आहेत. 319.17 कोटींची कर्ज वितरण करण्यात आले आहे.144.94 कोटींची गुंतवणूक करून संस्थेस चालू वर्षात 8.31 कोटी इतका नफा झाला आहे. सभासदांना 15 टक्के लाभांश देण्यात आले आहे.
संस्थेने आर्थिक सालात 2831 कोटींची उलाढाल केली आहे. समाजाच्या विकासाचे ध्येय ठेवून सभासद, ग्राहकांना सर्व प्रकारच्या बॅंकींग सुविधा पुरविल्या असून संस्थेच्या कर्मचाऱ्यांनीही प्रामाणिकपणे सेवा दिली आहे. भविष्यात विविध ठिकाणी नवीन शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संचालक श्रीकांत परमणे यांनी स्वागत केले. त्यांनी संस्थेच्या कार्याबध्दल माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन झाले.
मुख्य व्यवस्थापक शशीकांत आदण्णावर यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार झाला. तर सभासद, कर्मचाऱ्यांना 48 लाख रुपये विमा मदत सुपूर्द करण्यात आली. प्राणलिंग स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्ष सुरेश शेट्टी, संचालक किशोर बाली, प्रताप पट्टणशेट्टी, श्रीकांत परमणे, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, प्रताप मेत्राणी, सदाशिव धनगर, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, विद्या कमते, भद्रेश फुटाणे, महेश शेट्टी यांच्यासह सर्व शाखांचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, सभासद उपस्थित होते. दिनेश पाटील यांनी आभार मानले केले.
Belgaum Varta Belgaum Varta