तिन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज
निपाणी : बोरगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.13) पाचव्या दिवशी तिन्ही गटाकडून एकूण 12 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी निरंजन हिरेमठ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
गेल्या 8 डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रवेश प्रक्रिया चालू असताना देखील तिन्ही ही गटाकडून आज सोमवार (ता. 13) रोजी पाचव्या दिवशी या ठिकाणी 12 उमेदवारी अर्ज भरण्यात आलेली आहेत.
यामध्ये युवा नेते उत्तम पाटील गटाकडून व माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हवले गटाकडून अपक्ष म्हणून 8 जणांनी उमेदवारी दाखल केला आहे. तर आमदार-खासदार प्रेमी गटाकडून एकूण 4 उमेदवारांनी अर्ज भरला आहे. सध्या एकूण 12 उमेदवारी अर्जापैकी 3 उमेदवार महिला व 9 पुरुष म्हणून उमेदवारी भरण्यात आलेली आहे. वार्ड क्रमांक 1 मधून दोन अर्ज दाखल झाले असून एक भाजपा तर दुसरा अपक्ष आहे, वार्ड 3 मधून एक अर्ज अपक्ष आहे, वार्ड 6 मधून एक अर्ज भाजपा, तर वार्ड 7 मधून एक अर्ज अपक्ष आहे. वॉर्ड 9 मधून एक भाजपा, वार्ड 10 मधून एका पक्ष, वार्ड 11 मधून दोन अपक्ष, वार्ड 13 मधून एक अपक्ष, वार्ड 14 मधून एका पक्ष वार्ड 16 मधून 1 अपक्ष, असे संबंधित प्रभागमधून उमेदवारी अर्ज मुहूर्ताच्या वेळेत तिन्ही गटाकडून भरण्यात आले आहेत. अध्याप निवडणुकीसाठी दोन दिवसांचा अवधी बाकी असल्याने येणार्या दोन दिवसांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बोरगाव नगर पंचायतीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून निरंजन हिरेमठ, टी. टी. नाडकर्णी, जी. डी. मंकाळे, लक्ष्मण ए. के, एन. आर. रायकर यांच्यासह रूपल कांबळे काम पाहात आहेत.
—
काँग्रेसची माळ कोणाच्या गळ्यात
सोमवारी तिन्ही गटाकडून वेगवेगळ्या पद्धतीने एकूण बारा अर्ज भरण्यात आले असताना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकही अर्ज भरलेला नसल्याने बोरगाव काँग्रेस पक्षाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे वर्तविने कठीण झाले आहे.