कोगनोळी : बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने टिळकवाडी येथे आयोजित महामेळाव्यास महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांची गाडी कोगनोळी येथील टोलनाक्यावर अडवण्यात आले आहे.
महाराष्ट्र इथून बेळगाव येथील या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेतेमंडळी जाणार असल्याची माहिती मिळताच कर्नाटक पोलीस प्रशासनाच्यावतीने येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्या दूधगंगा नदीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापूर येथील शिवसेनेचे नेते विजय देवणे अन्य सहकारी बेळगाव येत असताना कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर त्यांच्या अडवणूक करण्यात आली.
यावेळी विजय देवणे यांनी आपल्याला का अडवण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थित अधिकार्यांना विचारला. यावेळी उपस्थित अधिकार्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या उद्देशाने आपल्याला कर्नाटकात प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना विजय देवणे म्हणाले, बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळाव्यात आपल्याला निमंत्रण देण्यात आहे. या मेळाव्यास आपण जात असताना कोगनोळी येथील तपासणी नाक्यावर अडवण्यात आले आहे. कर्नाटक शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे सीमाभागातील नागरिकांची हेळसांड होत आहे. या मेळाव्यास निमंत्रण असून देखील कर्नाटकात प्रवेश बंदी करणे हा लोकशाहीचा अपमान आहे. आआपण कोणत्याही परिस्थितीत बेळगावला जाणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
यावेळी निपाणी मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, निपाणी शहर पोलीस स्टेशन उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसुर, कोगनोळी पोलीस स्टेशनचे एएसआय एस. ए. टोलगी, पोलीस राजू गोरखनावर यांच्यासह अन्य पोलिस फौजफाटा मोठ्या संख्येने उपस्थित होता.
