काकासाहेब पाटील : लेफ्टनंट रोहित कामात यांचा सत्कार
निपाणी : पूर्वीच्याकाळी सैन्यदलात भरती होण्यासाठी युवकांचा ओढा कमी होता. पण अलीकडच्या दहा वर्षाच्या काळात देशाच्या संरक्षणासाठी युवक मोठ्या प्रमाणात सरसावत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. देशाच्या संरक्षणामध्ये सैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. लेफ्टनंट रोहित कामत यांच्या निवडीमुळे निपाणीच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याने निपाणी शहराच्या तालुक्याचे नाव उज्ज्वल केले असून त्याचा आदर्श युवकांनी घ्यावा. सीमेवर लढणार्या सैनिकांमुळे देशातील नागरिक सुरक्षित आहेत त्याची जाणीव प्रत्येकाने ठेवण्याचे आवाहन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले. येथील साखरवाडी कौसाबाई कॉलनीतील प्रदीप कामत यांचे चिरंजीव व माजी सभापती संदीप कामत यांचे पुतणे रोहित कामत यांची लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा येथील शुभ कार्य वधू-वर सूचक मंडळ व शहरवासीयांतर्फे येथील धर्मवीर संभाजी चौकात सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी माजी आमदार पाटील बोलत होते.
प्रारंभी दादासाहेब खोत यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते धर्मवीर संभाजी प्रतिमा पूजन झाले. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, नगरसेवक रविंद्र शिंदे व मान्यवरांच्या हस्ते रोहित कमात, प्रदीप कामत व संदीप कामत यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, प्रभाकर पाटील, माजी सभापती विश्वास पाटील, निकू पाटील, अशोक राऊत, विक्रम देसाई, उत्तम सांगावकर, विलास पाटील, विश्वनाथ जाधव, आप्पासाहेब खोत, संदीप खडके, अजित पाटील, अशोक खांडेकर, झुंजार दबडे, सुंदर साळुंखे, रोहन राऊत, समीर सय्यद, शिवम जासूद यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Check Also
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे
Spread the love पाणी प्रश्नासाठी आत्मक्लेष आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयातून येणार कमिटी निपाणी (वार्ता) : येथील …