लक्ष्मणराव चिंगळे ; भाजपने बंद केलेल्या योजना काँग्रेसने सुरू केल्या
निपाणी (वार्ता) : काँग्रेस सरकारच्या विरोधात निपाणीच्या लोकप्रतिनिधींनी नागण्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काढलेला मोर्चा हा केविलवाना आहे. भाजपच्या काळात बंद पडलेल्या अनेक शासकीय योजना काँग्रेस सरकार सत्तेवर येतात सुरू केले आहेत. त्यामुळे मतदार भाजपला सोडून काँग्रेसकडे जाण्याची भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी निपाणीत काढलेला मोर्चा हास्यास्पद असल्याचे मत चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी व्यक्त केले.
येथील शासकीय विश्राम धामात मंगळवारी सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, निपाणी शहर युवा काँग्रेस अध्यक्ष प्रतीक शहा, ग्रामीण अध्यक्ष अवधूत गुरव, निपाणी सेवा दल अध्यक्ष नजीर शेख, रामचंद्र निकम, रोहित यादव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
चिंगळे म्हणाले, सिद्धरामय्या यांच्याशी नेतृत्वाखालील दलित, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय आणि गरिबासाठी असलेल्या सर्व योजना यशस्वी झाल्या. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने भ्रष्टाचारात अडकून गोरगरिबांच्या योजना बंद केल्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, सकस आहार घोटाळा, शादी भाग्य योजना, इंदिरा कॅन्टीन, परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनुदान अशा योजनांचा समावेश आहे. याउलट सध्या सत्तेत असलेल्या सिद्धारामय्या सरकारने सर्व योजना पुन्हा सुरू केल्या असताना विरोधकांची ही वल्गना चुकीची आहे.
भाजपाने आपल्या कारकिर्दीत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ केला आहे. त्यांच्या काळातील सर्वच योजना कागदोपत्री राहिल्या आहेत. मात्र काँग्रेस सरकारने निवडणूक दिलेल्या सर्वच आश्वासनांची पूर्तता केली असून गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत दरमहा १ कोटी ८ लाख कुटुंबप्रमुख महिलांच्या खात्यावर एकाच वेळी प्रत्येकी दोन हजाराची रक्कम जमा होत आहेत. शिवाय शेतकरी, हातमाग व यंत्रमानधारकांना मोफत वीज पुरविली आहे.या सरकारच्या विविध महत्त्व आकांक्षा योजना मुळे नागरिकता भाजपला मुळासकट उपटून टाकतील याची भीती वाटल्यानेच निराशाजनक मानसिक स्थितीतून मोर्चा सारखा केविलवाना प्रयत्न केला आहे. तरी नागरिकांनी विरोधकांना समर्पकपणे उत्तरे देऊन सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta