नूतन मराठी विद्यालयाचा उपक्रम; इको फ्रेंडली गणेशाचा दिला संदेश
निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस बिघडत असलेल्या निसर्गाच्या संतुलनामुळे पर्यावरणाविषयी जागृत होणे गरजेचे आहे. केवळ सहा दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सवामध्ये घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या त्यामुळे पर्यावरणाच्या प्रदूषणासह जलचर प्राण्यांना धोका पोहोचत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक होण्यासाठी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आमचा बाप्पा आम्ही बनविणार हा उपक्रम राबवून मातीच्या गणेश मुर्त्या बनवल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाबाबत जनजागृती केली आहे.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करून खऱ्या जैविक शाडू मातीची ओळख सर्वांना व्हावे, या उद्देशाने मातीच्या विविध प्रकारच्या मूर्ती बनवल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने छोट्या, छोट्या सुंदर मूर्ती घडवल्या. व्यापक जागृतीसाठी राबवलेल्या या उपक्रमांचे पालकासह शिक्षकांनी कौतुक केले. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रा. चंद्रहास धुमाळ, संचालक विक्रमादित्य धुमाळ, सेक्रेटरी ए. सी. धुमाळ, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक व्ही. एम. बाचणे, एम. डी. खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी यु. आर. पवार, आर. एस. चव्हाण, व्ही. बी. पाटील, एस. आय. किवंडा, एस. बी. पवार, एस. एस. कुलकर्णी, ए. एम. कुंभार, एस. के. जोशी, एस. पी. जगदाळे, यु. वाय. आवटे, एस. आर. संकपाळ, यु. एम. पाटील उपस्थित होते
——————————————————————-
‘गणपतीच्या मूर्ती पर्यावरण पूरक मातीच्या असल्यास गणपती विसर्जन केल्यानंतर या मूर्ती तत्काळ विसर्जीत होतात. गणपती विसर्जनानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची आणि निर्माल्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होत आहे. त्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविला आहे.’
-एस. एस. पचंडी,
मुख्याध्यापक, माध्यमिक विभाग नूतन मराठी विद्यालय, निपाणी
——————————————————————-
‘आपल्या आसपास मिळणारी माती गणपती बनविण्यासाठी वापरायला हवी. विसर्जनानंतर त्यातून कुठलेही प्रदूषण होणार नाही. शिवाय आपला गणपती आपणच बनविण्याचा वेगळाच आनंद मिळाला.’
-शौर्य शिंदे, विद्यार्थी
Belgaum Varta Belgaum Varta