उत्तम पाटील : बोरगाव येथे पर्युषण पर्वास प्रारंभ
निपाणी (वार्ता) : चातुर्मास पर्वाला जैन धर्मात मोठे महत्त्व आहे. या चातुर्मास काळात प्राणी हिंसा टाळणे व समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी विविध विधान व नोपी केली जाते. तसेच पर्युषणपर्व काळात १६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम व नोपी केली जाते. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी सुख-समृद्धीसाठी या पर्युषण पर्वाचे आयोजन केले आहे, असे मत उत्तम पाटील यांनी दिली.
बोरगाव येथील १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे पर्यूषण पर्वास प्रारंभ झाला. याप्रसंगी मंदिरासमोर ध्वजारोहण करून ते बोलत होते.
पर्युषण पर्व श्रावक श्राविका कुटुंबासमवेत सहभाग घेऊन पुण्यप्राप्ती करून घेतात. दशलक्ष, सप्तमी, रत्नत्रय, अनंत,पंचमेरू हे विविध महत्त्वाचे व्रत या काळात केले जातात. या सोहळ्याचा सर्वश्राविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्तम पाटील यांनी केले.
यावेळी अभयकुमार करोले, आण्णासाहेब भोजकर, मीनाक्षी पाटील, विनयश्री पाटील, धनश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, अनिल पाटील, बाळासाहेब हवले, राकेश फिरगन्नवर, अनिल पाटील, बाहुबली पाटील, प्रीती कलकुटगी, प्रिया पाटील, भारती पाटील, उज्ज्वला पाटील, विनय मगदूम यांच्यासह श्रावक, श्राविका उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta