कोगनोळी : बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड वेदिकेच्या लोकांनी शाही फेक केल्याच्या निषेधार्थ बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणार्या कोगनोळी कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या शिवसेना व अन्य राजकीय लोकांच्यावर कडक लक्ष देण्यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेतेमंडळींना बेळगाव प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकी चार चाकी वाहन धारकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
मंगळवार तारीख 14 रोजी बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांना याठिकाणी अडवणूक करून त्यांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात आले होते. यावेळी विजय देवणे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
मंगळवार तारीख 14 रोजी बेळगाव बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकात शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते यांना कर्नाटक प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या चार चाकी वाहनधारकांवर या सीमा तपासणी नाक्यावर कडक लक्ष देण्यात आले आहे.
येथील दूधगंगा नदीवर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलीस स्टेशनचे एएसआय एस ए टोलगी, एस बी खोत यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
Check Also
महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू
Spread the love शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर …