एसडीआर फाउंडेशनचा उपक्रम; जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर
निपाणी (वार्ता) : एसडीआर फाउंडेशनने केआयएसच्या सहकार्याने बायो सीएनजीमधील जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून नेपियर गवता पासून पहिला बायो- सीएनजी प्लांटचा प्रारंभ केला आहे. हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे उभारण्यात येणार आहे. एसडीएस फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सीमा अनिल इंग्रोळे आणि केआयएस संचालक सुनील यांनी संस्थापक रघुनाथ यांच्या उपस्थितीत व्हेंचुरिओ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुधीर फडके यांच्यासोबत कमीत कमी कालावधीत प्रकल्प उभारण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली.
प्रकल्पासाठी केआयएसच्या संचालिका डॉ. ज्योती, उपाध्यक्ष शेषाद्री, अमरनाथ, आंबरीश आणि निखील यांनी प्रयत्न केले आहेत.
गेल्या ६ महिन्यांपासून डॉ. सीमा या नेपियर गवत, शेणखत, साखर कारखान्यांतील प्रेसमड आणि ओल्या कच-यापासून बायो सीएनजी प्रकल्प उभारण्यासाठी सल्ला देत आहेत. २५ संभाव्य कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र हा उपक्रमात नेतृत्व करेल याबद्दल त्या प्रयत्न करत आहेत. नेपियर गवतआणि प्रेस मडवर आधारित संपूर्ण महाराष्ट्रात बायोसीएनजी प्लांट्स उभारण्याची योजना आहे. अशा बायोगॅस उत्पादन प्रकल्पांची स्थापना करण्यामुळे भारतातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यास हातभार लागेल आणि परिणामी वातावरण चांगले होईल, असा आशावाद डॉक्टर सीमा इंग्रोळे यांनी व्यक्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta