निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकार चिक्कोडी पदवीपूर्वशिक्षण विभाग आणि केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय जलतरण, टेबल टेनिस, फ्लोरबॉल, आणि बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. प्रमुख पाहुणे म्हणून चिक्कोडी जिल्हा क्रीडा समन्वयक अजय मोने आणि निपाणी तालुका क्रीडा समन्वयक जिनदत्त पाटील
यांची उपस्थिती होती. स्पर्धेत केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयातील १७ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली आली.
पदवी प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांच्या उद्घाटन झाले. डॉ. हुरळी यांनी सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रा स्पर्धेमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
संस्थेचे संचालक अमर बागेवाडी, पदवीपूर्व प्राचार्या एच. डी. चिकमठ क्रीडा विभाग उपाध्यक्ष बी. एच. नाईक, शारीरिक प्रशिक्षक एस. सी. उदगट्टी यांच्या उपस्थितीत क्रीडा पार पडल्या.
जी. आय. बागेवाडी महा विद्यालयातील ५० ब्रिस्टस्ट्रोक मध्ये योगिता अबाने, ५० मिटर आणि १०० मिटर जलतरण स्पर्धेत लक्ष्मीबाई माळी प्रथम क्रमांक, सांघिक खेळातील मुलांच्या गटाने टेबल टेनिस मध्ये विजेतेपद पटकावले. सी. के. पी. यु. कॉलेज एकसंबा यांना फ्लोरबॉल स्पर्धेत विजेतेपद तर सीकेपी यू कॉलेज एकसंबा यांना उपविजेतेपद मिळाले.
बसवज्योती पियू कॉलेज एकसंबा महाविद्यालयातील प्रणव चावरे ५० मीटर ब्रिस्टस्ट्रोक जलतरण स्पर्धेत आणि १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक जलतरण स्पर्धेत प्रथम, आकाश किलिकेत १०० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत प्रथम, ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत द्वितीय, १००मीटर मिडल रिले मध्ये प्रथम, १०० मीटर फ्री स्टाईल रिले मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
टेबल टेनिस स्पर्धेत सीकेपीयू कॉलेज निपाणी मुलींच्या गटाने विजेतेपद तर जेएपियू कॉलेज अथणी उपविजेतेपद, ५० मिटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धे त अनिल कल्याणी प्रथम क्रमांक, ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक, १०० मीटर फ्री स्टाइल रिले प्रथम क्रमांक, बास्केटबॉल स्पर्धेत सी. एस. अंगडी पियू कॉलेज गोकाक मुलांच्या आणि मुलींच्या गटाने विजेतेपद तर एसएसएपी कॉलेज गोकाक यांनी उपविजेतेपद पटकाविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta