नोंदणी उद्घाटन सोहळा; यशस्वी खेळाडूंचा सत्कार
निपाणी (वार्ता) : निपाणी एंडोरन्स स्पोर्ट्स असोसिएशन (टीम नेसा) यांच्यामार्फत मॅरेथॉनमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूचा सत्कार करण्यात आला. येथील संगम पॅराडाईज हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चिक्कोडीचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळकृष्ण गौडर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर मॅरेथॉनमध्ये यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कर झाला.
डॉ. संदीप चिखले यांनी, निपाणी सारख्या भागामध्ये धावपटू क्रीडापटू तयार होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे. त्यांची आपल्या भागात ओळख निर्माण व्हावी. या क्रीडापटूची प्रेरणा घेऊन नविन क्रीडापटू व धावपटू निर्माण व्हावेत, यासाठी टीम नेसाने दोन वर्ष मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यावर्षीही टीम नेसाने येत्या १७ डिसेंबरला मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ पार पडला. कार्यक्रमांमध्ये मुंबई ते धारवाड पर्यंतच्या क्रीडापटू व धावपटूंचा सत्कार व नोंदणी करण्याचा कार्यक्रम झाला.
चिक्कोडीचे पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर व मान्यवरांनी मॅरेथॉन स्पर्धेबाबत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षका उमादेवी गौडा, ग्रामीणचे उपनिरीक्षक रमेश पवार, डॉ. अमित समर्थ, प्रशांत हिप्परगी, आशिष कसोडकर, डॉ. आनंद पाटील, आतिश खोत, दीपक मेंडगुदले, डॉ.सनत जमदाडे, डॉ. प्रमोद निळेकर, डॉ. शिवा दुमाले, सचिन कुलकर्णी, अर्जुन जनवाडे, शिव यादव, सदिया सय्यद, विनोद साबळे,पंकज वाळू, श्रीशैल ब्याकोड, तुषार माळी,डॉ. शिल्पा दाते, अमित पेंढारकर, नवनाथ इंदलकर, यांच्यासह टीम नेसाचे सभासद, पदाधिकारी, खेळाडू उपस्थित होते.