निपाणी (प्रतिनिधी) : बोरगाव येथील श्री अरिहंत को -ऑप. क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेट संस्थेतर्फे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध क्षेत्रातील मान्यवर आणि गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सहकार रत्न रावसाहेब पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक अभिनंदन पाटील व अरिहंत विविधोद्देशीय संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील उपस्थित होते.
प्रारंभी मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी अशोक बंकापूरे यांनी स्वागत केले. यावेळी यंदाच्या वर्षातील उत्कृष्ट शाखा पुरस्कार मिळाल्याबद्दल संकेश्वर शाखेचे व्यवस्थापक आणि संचालक मंडळांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय संस्थेला बहुराज्य कायद्यांतर्गत नोंदणीसाठी सहकार्य केल्याबद्दल कोल्हापूर येथील वकील शंकर गडगे, यूपीएससी परीक्षेत ७४६ गुणांनी यश मिळवल्याबद्दल बेडकिहाळ येथील अक्षय कुमार पाटील, पीयुसी द्वितीय वर्षात ९४ टक्के गुण मिळाल्याबद्दल शमणेवाडी येथील यश तपकिरे, सुपर क्रॉस नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल अब्दुल लाट येथील जिनेन्द्र सांगावे, करुनाड कणमणी पुरस्काराबद्दल बोरगाव मधील प्रकाश मडिवाळ, उत्कृष्ट शाखा व्यवस्थापक म्हणून बसवान कुडची येथील वसंत कुलकर्णी, उत्कृष्ट कर्मचारी म्हणून अजित पाटील आणि अरिहंत संस्थेमधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सदलगा मधील अभयकुमार वाघे यांना रावसाहेब पाटील, अभिनंदन पाटील व उत्तम पाटील यांना यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, अशोककुमार असोदे, संचालक जयगोंडा पाटील, अक्षयकुमार करोले, जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, पिरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे, सतीश पाटील, बाबासाहेब आपराज, श्रीकांत वसवाडे, एस.के. तेरदाळे, राजू पाटील- अकोळ, अरुण निकाडे, दिलीप पठाडे, इम्रान मकानदार, शिरीष कमते, निरंजन पाटील, इंद्रजीत पाटील, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, आनंद गिंडे, आर. टी. चौगुले, प्रकाश जंगटे यांच्यासह सर्व शाखांचे पदाधिकारी व सभासद कर्मचारी उपस्थित होते. आर. एस. पचंडी यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta