निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी या संघटनेच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनतर्फे निपाणी सीमाभागात रोजगार मेळावा साजरा केला होता. संघटना कुठे नावारूपास होत असताना संघटनेत दुफळी निर्माण झाली असून निपाणीमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभाग अशी दुसरी संघटना उभी करण्यात आली आहे..
गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी तसेच बेळगाव यांच्याअंतर्गत चुकीच्या कार्यपद्धतीला नाराज होऊन निपाणी भागातील पदाधिकाऱ्यांनी बंडा पाटील यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले. पण नेतृत्वाने या पदाधिकारी कार्यकर्ते आमोरा समोर येऊन नाराजी न काढता त्यांची बदनामी चालू केली. या गोष्टीमुळे नेतृत्वावर नाराजीचे सूर वाढत गेले. त्यातच बेळगाव युवा समितीने सुध्दा हे नेतृत्व बदलले नाही तसेच नाराज कार्यकर्त्यांना डावलून कार्यकारिणी जाहीर केली त्यामुळे दुसरी संघटना उभी करण्याचा विचार नाराज कार्यकर्त्यांनी सुरू केला.
या अनुषंगाने भिवशी या गावी एक प्रथम बैठक घेण्यात आली. यात सर्वांस निमंत्रण देण्यात आले होते पण युवा समिती बेळगाव यांनी नेमलेले पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभाग या संघटनेची नव्याने उभारणी करून सीमाभागासाठी सीमा प्रश्नावर काम करण्याचे ठरवले.
रविवार (दि. १७) रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक मा. सुनील किरळे व मा. राजकुमार मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली भिवशी (ता. निपाणी) येथे पार पडली. या बैठकीत नवीन पदाधिकारी तसेच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली जी हंगामी स्वरूपाची असेल. तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये मुख्यत्वेकरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, निपाणी भागातील मराठी भाषेची सद्यस्थिती व सीमाभागातील मराठी भाषिक विध्यार्थ्यांच्या अडचणी या बाबींचा अंतर्भाव होता. यावेळी संघटनेचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत पाटील भिवशी यांची एकमुखाने निवड करण्यात आली तसेच कपिल बेलवळे यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे
अध्यक्ष – श्री लक्ष्मीकांत पाटील (भिवशी)
उपाध्यक्ष – कपिल बेलवळे (मांगूर)
कार्याध्यक्ष – अमर सुभाष पाटील (सौंदलगा)
सचिव – रमेश कुंभार (यमगर्णी)
सोशल मीडिया – कपिल बेलवळे (मांगुर)
नानासाहेब पाटील (कुर्ली)
तात्यासाहेब कांबळे (भिवशी)
सदस्य- १)किरण शिंदे (पांगीरे)
२) विक्रम शिंदे (भिवशी)
३) प्रकाश घाटगे (आडी)
४) राकेश अंमलझरे (मांगुर)
५) जगदीश लोहार (भिवशी)
६) सनम कुमार माने (कोडणी)
७) संदीप खोत (मांगुर)
८) संतोष शिंदे (भिवशी)
९) सतीश जाधव (भिवशी)
१०) ओमकार रणमाळे (शिरगुप्पी)
११) अमोल नारे (गायकवाडी)
१२) संतोष काठवळे (आडी)
सल्लागार समिती
१) श्री. सुनील किरळे सर (निपाणी), २) श्री. प्रसंनकुमार गुजर साहेब (निपाणी), ३) श्री. राजकुमार मेस्त्री साहेब (निपाणी), ४) रामचंद्र नादवडे (आडी), ५) बी टी तराळ (मांगुर).