उत्तम पाटील; कारखान्याचा बॉयलर प्रदीपन सोहळा
निपाणी (वार्ता) : ऊस उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवून पाच वर्षापासून एफआरपी प्रमाणे ऊसाला योग्य भाव दिला आहे. अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने या हंगामात सर्व साखर कारखान्यांना उसाची टंचाई भासणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पूर्वीप्रमाणे आपल्या कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे. यंदाही इतर साखर कारखान्यांच्या प्रमाणे ही आपणही दर देणार असून लवकरच डिस्टिलरी प्रकल्प प्रारंभ करणार असल्याचे बोरगाव येथील विविधोद्दीय प्राथमिक ग्रामीण कृषी संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितले. जैनापूर येथील श्री अरिहंत शुगर इंडस्ट्रीज साखर कारखान्याचा सहावा बॉयलर प्रदीपन समारंभ शुक्रवारी (ता.२२) कारखान्याचे संस्थापक सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते.
अभय कुमार करोले व सरोजनी करोले दाम्पत्यांचे हस्ते पूजा झाली. रावसाहेब पाटील व मिनाक्षी पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्रीप्रदीपन करण्यात आला.
अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी, यावर्षी कमी पावसामुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे. ऊस उत्पादक शेतकरी व प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे कारखान्याची प्रगती होत आहे. यंदाच्या हंगामात ४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.
केंद्र सरकारचे धोरण व साखर आयुक्तांच्या निर्देशानुसार साखर कारखाना चालवीत असताना अनेक अडचणी येतात. तरीही ऊसाला योग्य भाव, कमी दरात साखर वितरण, डिस्टलरी प्रकल्प व गाळप क्षमता वाढवून आपण हा कारखाना उत्तम रीतीने चालवला असून गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास पृथ्वीराज पाटील,धनश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, अरिहंत संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, केदार कुलकर्णी, राकेश चिचणे, गजानन कावडकर, अमोल नाईक, हुक्केरी वकील राजीव चौगुले, अभिजीत पाटील, सुभाष शेट्टी, मनोजकुमार पाटील सुमित रोड्ड, सीईओ आर. के. शेट्टी, अरिहंत संस्थेचे सीईओ अशोक बकापुरे, पीकेपीएसचे व्यवस्थापक आर. टी. चौगुला, दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी तोडकर, प्रदीप माळी राजेंद्र पाटील यांच्यासह अरिहंत परिवाराचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta