निपाणी (वार्ता) : येथील जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघातर्फे १२ सप्टेंबर पासून पर्यूषण पर्वाचे आयोजन करण्यात आले. या काळात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पर्यूषण पर्व समाप्तीनिमित्त शहराच्या प्रमुख मार्गावरून भव्य वर घोडा मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत चांदीची पालखी, चांदीचा रथ, चांदीचा पाळणा, १४ स्वप्न, इंद्रध्वज यांचा समावेश होता.
बेडकीहाळ व निपाणी येथील बँडच्या निनादात ही मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये हत्ती, घोडे यांचा सहभाग होता. गुरुवार पेठ येथील चंद्रप्रभू बावन जिनालय पासून कोठीवाले कॉर्नर, अशोकनगर, जुना पीबी रोड, नगरपालिका, जुना मोटार स्टँड, नेहरू चौक, महादेव गल्ली, गांधी चौक, रविवार पेठ मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली.
१२ सप्टेंबरपासून १९ सप्टेंबरपर्यंत आचार्य दौलतसागर सुरिश्वर महाराजांच्या शिष्या साध्वी हिरेयशाश्रीजी यांच्या उपस्थितीत श्रावक-श्राविकांनी जप, तप, उपवास व धार्मिक कार्यक्रम केले. यावेळी हत्ती घोड्यावर बसण्यासाठी श्रावक श्राविकांनी सवाल घेतले होते. तसेच महावीर जन्मकल्याणक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे चेअरमन, ट्रस्टी तसेच जीन सेवा मंडळ, चंद्रप्रभू श्राविका मंडळ, जैन सांस्कृतिक महिला मंडळ, भूषण विहार ग्रुप, गिरी सेवा ग्रुप व श्रावक-श्राविकांनी परिश्रम घेतले. अरविंद गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. जैन समाजाच्या भवनामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta