निपाणी (वार्ता) : निपाणी को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट संस्थेमध्ये पदाधिकारी निस्वार्थीपणे कार्यरत आहेत. पण प्रशासकीय कारकिर्दीमुळे संस्थेला नफा झालेला नाही. सभासदांच्या हितासाठी सभासद प्रयत्नशील असल्याचे संस्थेचे सेक्रेटरी बाळकृष्ण मगदूम यांनी सांगितले. येथील निपाणी को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेटच्या ३६ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जोरापुरे होते.
संचालक सुधाकर थोरात यांनी स्वागत केले. सेक्रेटरी मगदूम म्हणाले, संस्थेचे ६८४ सभासद, ३ लाख ४२ हजाराचे भाग भांडवल असून १६ लाखावर खेळते भाग भांडवल आहे. नवीन प्लॉटची मागणी असल्यास संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
अध्यक्ष बाळासाहेब जोरापुरे यांनी, सध्या संस्थेतर्फे सभासदांना ३ पैसे चौरस फूट प्रमाणे जागेची आकारणी सुरू असून ११ रुपये विकास कर भरून सेलडील करून घ्यावे.
खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाने औद्योगिक वसाहत परिसरात रस्ते गटारी वीज पाणी अशा सुविधा उपलब्ध झाले आहेत. वसाहतीची ३० एकर जागा असून २२० प्लॉटधारक असून लहान मोठे उद्योग व्यवसाय असून तेथे दोन हजार कामगार कार्यरत आहेत. येथे सांस्कृतिक भवन निर्माण करण्याची मागणी आमदार जोल्ले दाम्पत्याकडे केल्याचे सांगितले.
त्यावेळी हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, समीत सासणे, प्रकाश शिंदे, किरण निकाडे, मलगोंडा पाटील, सुहास गुग्गे, रावसाहेब फराळे यांच्यासह नगरसेवक सद्दाम नगारजी, प्रणव मानवी, प्रशांत पाटील यांच्यासह मान्यवरांचा सत्कार झाला.
सभेस शशिकांत सासणे, धनाजी भाटले, गुरुनाथ पाटील, सचिन जाधव, सुवर्णा सुरवसे, ऋतुजा शहा, सुशांत भिसे, इलियास पटवेगार, जितेंद्र कमते, आदित्य सासणे, पिंटू सासणे, राजू पाटील संजय सासणे, रावसाहेब सासणे, माधव कुलकर्णी बाळकृष्ण शिंपूकडे यांच्यासह संचालक सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष धोंडीराम कणसे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta