
संस्थापक अभयकुमार मगदूम यांची माहिती
निपाणी (वार्ता) : शेतकरी व सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी जय गणेश मल्टीपर्पज सोसायटी कार्यरत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार लवकर शाखा विस्तार होणार आहे. आर्थिक वर्षात संस्थेला ११ लाख ६१ हजाराचा निवडणुका झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी दिली.
बोरगाव येथे आयोजित संस्थेच्या १४ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासो वठारे होते.
अभयकुमार मगदूम म्हणाले, संस्थेचे ८७८ सभासद, १० लाखावर भाग भांडवल, ८ कोटी ६२ लाखावर ठेव, संघ संस्थांमध्ये ३ कोटी ३ लाखावर गुंतवणूक, ५ कोटी ८५ लाखावर कर्ज वितरण करून अहवाल सालात ११ लाख ६१ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून १२ टक्के लाभांश देणार असल्याचे मगदूम यांनी सांगितले. अरिहंत संस्थेच्या संचालकपदी
शिवानंद राजमाने, राजु पाटील,अनिता मगदूम, सुमित रोड्ड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला.
बाबसाहेब वठारे यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यवस्थापक संतोष हंचनाळे यांनी नफा तोटा, अंदाजपत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली. सभेत उपाध्यक्ष सचिन रोड्ड, संचालक राजगौडा पाटील, तेजपाल मगदूम, इलाई मकानदार, रावसाहेब सवाडे, बाहुबली फिरगणवर, राजेंद्र फिरगन्नवर, कुणाल वठारे, मौला मुजावर, रोहिणी फिरगन्नवर, सन्मती हणजे, महादेव सनदी, राजू मगदूम, अशोक पाटील, पिरगोंडा पाटील, अरुण बोने, सचिन पाटील यांच्यासह संचालक, नगरसेवक, सभासद उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta