
निपाणी (वार्ता) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत असलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता.१) सायंकाळी ६ वाजता शेंडूर येथे सिध्देश्वर मंदिरा जवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान आणि शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. तरी परीसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी युवा आघाडीच उपाध्यक्ष नितेश कोगनोळे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta